Advertisement

कर्मचारी नसल्यानं चिंचपोकळी स्थानकातील तिकीट खिडकी बंद

मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील तिकीट खिडकी दुपारच्या वेळेस बंद असल्यानं प्रवाशांना स्थानकातील कल्याणच्या दिशेकडील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढावी लागते. तसंच, यामुळं प्रवाशांना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

कर्मचारी नसल्यानं चिंचपोकळी स्थानकातील तिकीट खिडकी बंद
SHARES

मुंबईत रेल्वेनं प्रवाशांना प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळं रेल्वे प्रवासासाठी तिकीट खिडक्यांवरील मोठ्या रांगेत उभं राहून तिकीट खरेदी करावं लागतं आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या चिंचपोकळी स्थानकातील सीएसएमटी दिशेकडील तिकीट खिडकी दुपारच्या वेळेस बंद असल्यानं प्रवाशांना स्थानकातील कल्याणच्या दिशेकडील तिकीट खिडकीवर जाऊन तिकीट काढावी लागत आहे. यामुळं प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. 


दुपारच्या वेळेस बंद

चिंचपोकळी स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ आणि २ वर सीएसएमटीच्या दिशेला असलेल्या पुलावर ही तिकीट खिडकी आहे. ही तिकीट खिडकीवर सकाळी ८ ते दुपारी ४ या याचवेळेत काम सुरू असते. मात्र, दुपारच्या वेळेस कर्मचारी नसल्यानं तिकीट खिडकी बंद असते.


तिकीट खिडकीसमोरील जागा  कमी

ही तिकीट खिडकी बंद असल्यामुळं प्रवाशांना गर्दीच्यावेळी तिकीट काढण्यासाठी स्थानकातील सीएसएमटी दिशेकडून कल्याणच्या दिशेनं चालत जाव लागतं. मात्र, कल्याणच्या दिशेकडं असलेल्या तिकीट खिडकीसमोर जागा कमी असल्यानं प्रवाशांची गैरसोय होते.हेही वाचा -

बाॅसच्या आदेशानंतर कोळंबकर करणार युतीचा प्रचार

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी टाटा कंपनीशी चर्चासंबंधित विषय