Advertisement

बोरिवलीतील बाचाबाचीप्रकरणी उर्मिला मातोंडकरविरोधात तक्रार दाखल

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीचं सोमवारी आयोजन करण्यात आलं होतं. प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकर यांची रॅली बोरिवली स्थानकाजवळ आली असता काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

बोरिवलीतील बाचाबाचीप्रकरणी उर्मिला मातोंडकरविरोधात तक्रार दाखल
SHARES
Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या उत्तर मुंबईतील उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या प्रचार रॅलीचं सोमवारी आयोजन करण्यात आलं होतं. प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकर यांची रॅली बोरिवली स्थानकाजवळ आली असता काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या प्रकरणी उर्मिला यांनी उर्मिला यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली असून घडल्या प्रकाराची तक्रार दाखल केली. मात्र, आता या प्रकरणी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी उर्मिला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.  


तक्रार दाखल

या प्रकरणी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी बोरिवलीमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील अधिकाऱ्याशी चर्चा करत उर्मिला यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यावेळी आमदार प्रवीण दरेकर, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष विनोद शेलार आणि नगरसेवक गणेश खनकर उपस्थीत होते. भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रार दाखल करत 'बोरिवली स्थानकात जी मोदी-मोदी असे नारे देत होते, ती सामन्य माणसं होती. तसंच, यांच्यामध्ये काही जण कॉलेज विद्यार्थी होते. ज्यांचा या प्रकाराशी काही संबंध नव्हता. त्याशिवाय, याआधी राहुल गांधी यांच्या रॅलीवेळी मोदी-मोदी असे नारे देण्यात आले होते. मात्र, त्यावेळी नारे देणाऱ्या लोकांना मारहाण झाली नव्हती', असं म्हटलं आहे.


कारवाई करण्याची मागणी

उर्मिला यांच्याविरोधात तक्रार दाखल करत 'ज्या ठिकाणी काँग्रेस आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली त्या ठिकाणच्या सीसीटीव्हींची तपासणी करावी. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोदी-मोदी असे नारे देणाऱ्या सामान्य माणसांना मारहाण केली आहे. तसंच, महिलांवर देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी हात उचलला आहे. जे लोक मोदी-मोदी असे नारे देत होते ते सामान्य प्रवासी होते. त्यामुळं याप्रकरणी पोलीस आणि निवडणूक आयोगानं या तक्रारीची दखल घेत लवकरात लवकर कारवाई करावी’, अशी मागणी भाजप नगरसेवक गणेश खनकर यांनी केली आहे.हेही वाचा -

बंगळुरु पुन्हा पराभूत, मुंबईचा ५ गडी राखून विजयसंबंधित विषय
Advertisement