पूर्वसूचना न देताच हार्बरवर ब्लॉक, प्रवासी अर्धा तास ट्रेनमध्येच अडकले

हार्बर रेल्वे मार्गावर गेल्या अर्ध्या तासापासून लोकल सेवा ठप्प झाली आहे. ऐन उन्हाळ्यामध्ये टिळक नगर स्थानकात २५ ते ३० मिनीटं लोकल थांबवून ठेवल्यानं प्रवाशांनी संतापाचं वातावरण निर्माण झालं होतं

SHARE

हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास लोकलसेवा अर्ध्या तास ठप्प झाली. मध्य रेल्वे प्रशाससाने ऐन उन्हाळ्यात टिळक नगर स्थानकात २५ ते ३० मिनीटं लोकल थांबवून ठेवल्यानं प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं. अधिक माहिती घेतली असता मध्य रेल्वेनं कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक ब्लॉक घेतल्याचं समोर येत आहे. 


तांत्रिक बिघाडाची चर्चा 

हार्बर मार्गावर मंगळवारी सकाळी ११ वाजता टिळकनगर स्थानकादरम्यान लोकल गाड्या थांबवून ठेवण्यात आल्या. लोकल थांबल्यामुळं तांत्रिक बिघाड झाल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरू होती. मात्र, लोकल गाड्या थांबण्या मागचं कारण कोणालाच माहिती नव्हतं. 


पूर्वसूचना न देता ब्लॉक

याबाबत काही वृत्तवाहिन्यांनी रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनाही याबाबत काहीच माहिती नव्हती. अखेर मध्य रेल्वेनं प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता ब्लॉक घेतल्याचे समोर आलं आहे.हेही वाचा -

मेट्रो-३ प्रकल्पाच्या भुयारीकरणाचं काम ४५ टक्के पूर्ण

कर्मचारी नसल्यानं चिंचपोकळी स्थानकातील तिकीट खिडकी बंद


संबंधित विषय