विकासाच्या वाटेवर जाणारी मुंबई कुपोषित

  Mumbai
  विकासाच्या वाटेवर जाणारी मुंबई कुपोषित
  मुंबई  -  

  पालिका शाळांमध्ये 3 मुलांमागे 1 मुलगा कुपोषित असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 2013-14 मध्ये पालिकेच्या शाळेत तब्बल 30,461 मुले कुपोषित असल्याचे आढळून आले होते. 2015-16 मध्ये त्यात लक्षणीय वाढ झाली असून ही संख्या 1,30,680 वर पोहोचली आहे. एवढेच नव्हे, तर पालिका शाळांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. मात्र गेल्या 2 वर्षांत या निधीच्या रकमेतही घट करण्यात आल्याची बाब प्रजा फाऊंडेशनने माहितीच्या आधिकाराचा वापर करून समोर आणली आहे.

  मुंबईच्या गोवंडी भागात सर्वाधिक म्हणजे 51 टक्के कुपोषित बालके आढळून आली आहेत. या पाठोपाठ चेंबूर, कुलाबा, ग्रॅण्टरोड, भायखळा, माटुंगा या भागातही कुपोषित बालके आढळून आली आहेत.

  कुपोषित मुलांची ही आकडेवारी अतिशय भयानक आहे. सरकारने प्रत्येक मुलाला पोषित आहार मिळतोय की नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ज्या वॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात कुपोषित मुले आढळली आहे, त्या वॉर्डकडे महानगरपालिकेने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
  - मिलिंद म्हस्के, संचालक, प्रजा फाऊंडेशन

  2013-14 मध्ये पहिलीच्या वर्गात कुपोषित मुलींची संख्या 3,123 इतकी होती. तर 2015-16 या वर्षी 10,802 वर पोहोचली आहे. पाचवीच्या वर्गातील मुलांची संख्या 2013-14 या वर्षी 2,591 इतकी होती. तर 2015-16 या वर्षी यात वाढ होत 10,562 वर पोहोचली आहे. याशिवाय एच/पूर्व व एल या भागात कुपोषित मुलांचे प्रमाण 9,100 व 6,586 एवढे आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.