Advertisement

आता घरच्या घरीही करता येईल अभ्यास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्राॅम होम’ योजना

शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ‘लर्न फ्रॉम होम’ (learn from home) म्हणजेच घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले.

आता घरच्या घरीही करता येईल अभ्यास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्राॅम होम’ योजना
SHARES

शालेय विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ‘लर्न फ्रॉम होम’ (learn from home) म्हणजेच घरी असतानाही अभ्यासक्रम पूर्ण करण्यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याचे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची आॅनलाइन बैठक घेतली होती. या बैठकीला अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोलंकी, शिक्षण संचालक दिनकर पाटील तसेच राज्यातील शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा- मुंबईत मास्कविना बाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार

शैक्षणिक नुकसान नको

कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशभरात लाॅकडाऊन (lockdown) करण्यात आला आहे. या लाॅकडाऊनमुळे परीक्षा शेवटच्या टप्प्यात आलेल्या असतानाही शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद ठेवण्यात आल्या आहेत. हा लाॅकडाऊन आणखी किती काळ चालेल याची काहीही शाश्वती नाही. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये म्हणून वेगवेगळे पर्याय चाचपून पाहण्याच्या सूचना शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केल्या.

ई-मटेरियल बनवा

दैनंदिन शिकवणीचा आराखडा तयार करून टीव्ही, रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावं. बनवण्यात आलेलं हे ई-मटेरियल बालभारती व एससीईआरटी यांनी एकत्रितपणे द्यावं. जेणेकरून विद्यार्थ्यांना घरी बसूनही अभ्यासक्रम पूर्ण करता येईल, याकडे जलदगतीने काम करण्याच्या सूचना गायकवाड यांनी दिल्या. 

हेही वाचा- राज्य सरकार सुरू करणार फिव्हर क्लिनिक- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

स्मार्टफोनचा वापर 

अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण कशाप्रकारे उपलब्ध करून देता येईल, याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली. स्मार्ट फोनच्या माध्यमातून दीक्षा ॲप विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात यश आल्याचं यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे इयत्ता निहाय पालक, शिक्षकांचे व्हॉटसॲप ग्रुप तयार करून विद्यार्थी व शिक्षकांसाठी आराखडा दिल्याचंही अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

विनाअनुदानित शाळांना टप्याटप्याने देण्यात येणाऱ्या अनुदानबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य ती कार्यवाही करण्याबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा