Advertisement

मुंबईत मास्कविना बाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार

राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 590 वर गेली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने कडक पाऊल उचललं आहे.

मुंबईत मास्कविना बाहेर पडल्यास गुन्हा दाखल होणार
SHARES

राज्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले आहेत. मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या 590 वर गेली आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने कडक पाऊल उचललं आहे. घराबाहेर पडताना आणि सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणं महापालिकेने बंधनकारक केलं आहे. 

मास्क नसेल तर पोलीस तुम्हाला अटकही करू शकतात. मास्क न वापरल्यास भा.दं.वि कलम १८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला जाणार आहेत. तसा नियमच महापालिकेने केला आहे. याबाबतचं पत्रकही पालिकेने काढलं आहे. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होऊ नये म्हणून महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. हा मास्क 3 पदरी पाहिजे. तो घरी तयार केलेला असला तरी चालणार आहे, असं या पत्रकात म्हटलं आहे.

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशींनी नवा आदेश जारी केला आहे.  1887 च्या कायद्यानुसार हा आदेश जारी करण्यात आलेला आहे. या आदेशानुसार सार्वजनिक ठिकाणी वावरताना बाजारात जाताना तुम्हाला मास्क घालणं बंधनकारक आहे.याशिवाय सरकारी अधिकारी कर्मचारी यांना यांना कार्यालयात काम करताना ही मास्क बंधनकारक आहे.

गाडीमध्ये तुम्ही बसला खासगी गाडी असेल तरीही मास्क बंधनकारक आहे. हा वैद्यकीय दृष्ट्या प्रमाणित मास्क असावा असं नाही तर साधा रुमालाचा बनवलेला किंवा साध्या कापडाचा बनवलेला मास्कही वापरू शकता. यापूर्वी विविध राज्यात मास्क वापरण्याबाबत निर्णय घेण्यात आले आहेत. चंदीगडमध्येही मास्क वापरणं अनिवार्य करण्यात आलं होतं. याशिवाय ओदिशा सरकारनेही सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक केलं आहे.हेही वाचा -

संपूर्ण धारावी केली सील, 2 नवे रूग्ण आढळले

भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा