Advertisement

संपूर्ण धारावी केली सील, 2 नवे रूग्ण आढळले

धारावीत बुधवारीही कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या आता ९ वर गेली आहे.

संपूर्ण धारावी केली सील, 2 नवे रूग्ण आढळले
SHARES

धारावीत बुधवारीही कोरोनाचे 2 रुग्ण आढळले आहेत. धारावीतील कोरोना रुग्णांची संख्या आता ९ वर गेली आहे. त्यामुळे आता संपूर्ण धारावी लाॅकडाऊन करण्यात आली आहे.  महापालिकेने संपूर्ण धारावी परिसर सील केला आहे.

धारावीपाठोपाठ माहीममध्ये पहिल्यांदाच कोरोनाचे 2 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. धारावीत दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असतानाच धारावीच्या बाजूलाच असलेल्या माहीममध्येही करोनाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढलं आहे.

5 लाख लोकसंख्या असलेली धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे.  धारावीत आतापर्यंत 9 कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. धारावीतील धनवाडा चाळीमध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीला आणि मुकुंद नगर येथील २५ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे. या रूग्णांनी कोणताही परदेशी प्रवास केलेला नाही. या सर्वांना एक कोरोना पॉझिटिव्हच्या संसर्गामुळे संक्रमण झाले आहे, ही सर्वात चिंताजनक बाब आहे. मुकुंद नगरमध्ये करोनाची लागण झालेल्या या तरुणाच्या वडिलांनाही करोनाची लागण झालेली आहे. वडिलांच्या संपर्कात आल्याने त्यालाही लागण झाली आहे.   मुकुंदनगर परिसर या आधीच सील करण्यात आला असून धनवाडा परिसरही सील करण्यात आला आहे.  

माहीममध्येही कोरोनाचे 2 रुग्ण सापडले आहेत. माहीमच्या एमएमसी मार्गावरील यूनिक हाइट्समध्ये हा ४३ वर्षीय व्यक्ती राहतो. त्याचं वरळीच्या जिजामाता नगरमध्ये मटनाचं दुकान आहे. त्याला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही व्यक्ती राहत असलेली इमारत सील करण्यात आली असून इमारतीतील सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच माहीमच्या विंजेवाडी नर्स हॉस्टेलमध्येही एक रुग्ण आढळला आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील नर्स या हॉस्टेलमध्ये राहते. 



हेही वाचा -

भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट

परळच्या बेस्ट वसाहतीतील ६० कुटुंबांचं विलगीकरण




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा