Advertisement

Coronavirus Updates: परळच्या बेस्ट वसाहतीतील ६० कुटुंबांचं विलगीकरण

इमारतीत ६० कुटुंबं राहत असून त्यांचे तात्पुरते विलगीकरण केलं आहे.

Coronavirus Updates: परळच्या बेस्ट वसाहतीतील ६० कुटुंबांचं विलगीकरण
SHARES

मुंबईतील बेस्टच्या वसाहतीमध्ये देखील कोरोनानं जाळं टाकलं आहे. बेस्टच्या परळ येथील कामगार वसाहतीत बेस्ट कामगाराच्या नजीकच्या नातेवाईकास कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून संबंधित कामगार राहत असलेली इमारत सील करण्यात आली असून, त्या इमारतीत ६० कुटुंबं राहत असून त्यांचे तात्पुरते विलगीकरण केलं आहे.

बेस्टच्या परळ येथील कामगार वसाहतीतील नजीकच्या नातेवाईकास करोनाची लागण झाल्यानं लगोलग तिथं काळजी घेतली जात आहे. त्याचवेळी बेस्ट उपक्रमाकडून कामगारांच्या सुरक्षेविषयी अनास्था बाळगली जात असल्याचा आक्षेप घेतला जात आहे. मुंबईतील बहुतांश आगारांमध्ये कामगारांसाठी पुरेशा सुविधा नसून गर्दी कमी होत नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

परळमधील कामगार वसाहतीमध्ये कोरोनाचं जाळ निर्माण झालं असून, महापालिकेकडून इथं इमारत सील करण्यासह निर्जंतुकीकरणही केलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखला जावा म्हणून त्या इमारतीत राहणाऱ्या कामगारासह सहकाऱ्यासही विलग केले आहे. बेस्ट उपक्रमातील विद्युत विभागातील एका कामगारास कोरोना झाला असून त्यापाठोपाठ परळमधील एका कामगाराच्या घरातही कोरोनाचे दोन रुग्ण आढळले. त्यामुळे पुन्हा एकदा बेस्टमधील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बेस्टनं अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी चालक-कंडक्टरांनी त्यांनी तात्काळ कामावर उपस्थित राहावं असे आदेश दिले असून, अन्यथा मेमोची कारवाई सुरू केली आहे. या दबावामुळे कामगारांमध्ये नाराजी आहे. तेव्हा कोणत्याही स्थितीत ड्युटीवर हजर राहण्यासाठी कामगारांची गर्दी जमत आहे. त्यामुळं आगारांमधील गर्दीत आणखी भर पडली असल्यानं वेगळीच समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आधीच मास्क, सॅनिटायझरसारख्या प्राथमिक सुविधांचा अभाव असताना नव्यानं गर्दी झाल्यानं आणखीनच दाटीवाटीनं राहावं लागतं.



हेही वाचा -

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट

गिरगावकरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत



Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा