Coronavirus Updates: भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

कोरोनामुळं मुंबईत आणखी एक महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

Coronavirus Updates: भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू
SHARES

कोरोनामुळं मुंबईत आणखी एक महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाची लागण झालेली ही महिला वांद्र्यातील भाभा रुग्णालयात उपचार घेत होती. दरम्यान, मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असून, मुंबईत ४४ नवे कोरोनाची लागण झालेले रुग्ण आढळल्याची माहिती समोर येत आहे. 

महापालिकेच्या वांद्रे येथील भाभा रुग्णालयात कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्याचप्रमाणं, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीनं रुग्णालयाबाहेर येऊन भाभा रुग्णालय क्वारंटाईन करण्याची मागणी केली आहे. 

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर येत आहे. राज्यात कोरोनाते ६० नवे रुग्ण आढळल्यानं रुग्णांची संख्या १०७८ वर पोहोचली आहे. यामध्ये एकट्या मुंबईत ४४ नवे रुग्ण आढळले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत ४४, नागपूर ४, बुलढाणा १, आकोला १, नगर १, आणि पुण्यात ९ रुग्ण आढळले आहेत.हेही वाचा -

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट

परळच्या बेस्ट वसाहतीतील ६० कुटुंबांचं विलगीकरणसंबंधित विषय