Advertisement

'या' शाळांकडून पालकांना येत्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी संपर्क

केंद्रीय शिक्षण मंडळाच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना या संपूर्ण कालावधीमध्ये शुल्क जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं सर्व शिक्षणसंस्थांना केल्या आहेत.

'या' शाळांकडून पालकांना येत्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी संपर्क
SHARES

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर भारतात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या लॉकडाऊनच्या काळात सरकारनं अनेक महत्वाचे निर्णय घेतले असून, यामध्ये शाळांनी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची सक्ती या काळात करू नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने शासन निर्णयाद्वारे देण्यात आल्या आहेत. मात्र असं असतानाही राज्यातील खासगी तसेच केंद्रीय मंडळाच्या शाळांकडून पालकांना येत्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

काही शाळांमधून आम्ही डिजिटल वर्ग सुरू करणार आहोत. त्यामुळं शुल्क वेळेत भरावे व तसे न केल्यास शाळेचे अॅप वापरता येणार नाही, असे सांगण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या तसेच सर्व व्यवस्थापनाच्या शाळांना या संपूर्ण कालावधीमध्ये शुल्क जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागानं सर्व शिक्षणसंस्थांना केल्या आहेत. याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जारी केला आहे. यानंतरही अनेक शाळांनी पालकांपुढे शुल्क भरण्यासाठी तगादा लावला आहे. यामुळे पालकांकडून शाळा आणि सरकारविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. 

एकीकडे शाळांनी पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क भरण्यासाठी मगादा लावल्यानंतर पालकांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. मार्च तसेच एप्रिलमध्ये विद्यार्थी शाळेत जाणार नसल्याने या दोन महिन्यांचे स्कूलबसचे शुल्क तसेच विद्यार्थ्यांचे भोजन शुल्क परत द्यावे, अशी मागणी पालक करू लागले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा