Advertisement

रुईया कॉलेजमध्ये क्विझ कॉम्पिटिशन


रुईया कॉलेजमध्ये क्विझ कॉम्पिटिशन
SHARES

सायन - तांबेकर ट्रॉफी आंतर माहाविद्यालयीन क्विझ 2017 ही स्पर्धा शुक्रवारी रुईया महाविद्यालयात पार पडली. रुईया महाविद्यालयातील नंदकुमार तांबे या विद्यार्थ्याच्या आठवणीत ट्रॉफीचे नाव तांबेकर ट्रॉफी असे ठेवण्यात आले आहे. 1981 पासून क्विझ स्पर्धा ही रुईया महाविद्यालयात घेतली जात आहे.

मुंबईतील एकूण 30 महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून अंतिम फेरीत फक्त 4 महाविद्यालये निवडण्यात आली. एकूण 5 फेऱ्या या स्पर्धेत घेण्यात आल्या. प्रत्येकी १० गुण अचूक उत्तरास देण्यात आले. त्यांपैकी अभिजित बारसे आणि आशुतोष पाल (जोशी बेडेकर महाविद्यालय) यांना प्रथम पारितोषिक ट्रॉफी, रोख रक्कम 2000 रुपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले. द्वितीय पारितोषिक अमेय माटे आणि उत्कर्ष जोशी (ए.सी.पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग) यांना रोख 1000 रूपये आणि प्रमाणपत्र देण्यात आले.

"मयुरी धुमाळ, रिद्धी जोशी, वरद मोडक, मितेश शिलोत्री, ओंकार भोळे, शिवानी कुलकर्णी या विद्यार्थ्यांनी प्रश्नमंजुषा तयार करण्यापासून ते अगदी आयोजनाची व्यवस्था करून ही स्पर्धा उत्तमरित्या पार पाडली," असे रुईया क्विझ क्लबच्या सदस्य शिल्पा नेवे यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा