Advertisement

दहावीच्या बोर्डाच्या परिक्षा वेळापत्रकात होणार बदल


दहावीच्या बोर्डाच्या परिक्षा वेळापत्रकात होणार बदल
SHARES

मुंबई - येत्या 2017च्या 10 वीच्या परिक्षेच्या वेळापत्रकात चार पेपर सलग आल्यानं विद्यार्थी आणि पालक नाराज झाले होते. त्यामुळे दहावी बोर्डाच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल होणार आहे. शिक्षण आयुक्त धीरज कुमार यांनी मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांना वेळापत्रकाच्या बदलण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

दहावीची बोर्डाची परीक्षा 7 मार्च ते 29 मार्च 2017ला होणार आहे. एसएससीच्या परीक्षेचं वेळापत्रक 28 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलं होतं. 20 ते 23 मार्च 2017 या दरम्यान दहावीचे चार पेपर सलग आहेत. त्यामध्ये विज्ञान भाग 2, इतिहास-नागरिक शास्त्र, भूगोल-अर्थशास्त्र आणि आयसीटीचा (Information and Communication Technology) पेपर आहे. या सलग वेळापत्रकामुळे पेपरमध्ये एक दिवसाचे अंतर नसल्यानं अभ्यास कसा करणार? असा प्रश्नं विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना या पेपरच्या दरम्यान सुट्टी हवी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. त्यानंतर शिक्षण परिषदेचे सदस्य अनिल बोरनारे यांनी दहावीच्या वेळापत्रकात बदल करा, अशी मागणी बोर्डाकडं केली. तसंच शिक्षक आमदार कपिल पाटील दोन पेपरमध्ये अंतर ठेवण्याची मागणी केली होती. याची दखल घेत शिक्षक आयुक्तांनी वेळापत्रकात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा