Advertisement

सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिकेची हकालपट्टी, पालकांना दिलासा!


सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिकेची हकालपट्टी, पालकांना दिलासा!
SHARES

दिवसेंदिवस वाढणारी शाळांची फी, अतिरिक्त शुल्क अाकारणी अाणि मनमानी कारभार यामुळे त्रस्त झालेल्या पालकांना अखेर अाशेचा किरण दिसू लागला अाहे. सरस्वती शाळेच्या मुख्याध्यापिकेची हकालपट्टी झाल्याने शाळांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारांना अाळा घालता येऊ शकतो, हा विश्वास अाता पालकांना मिळाला अाहे. गेले कित्येक महिने शाळांविरोधात अनेक तक्रारी होऊनही कोणत्याच प्रकारची कारवाई होत नव्हती. मात्र बालहक्क अायोगाकडे तक्रार केल्यास, अाता पालकांना न्याय मिळू शकतो, ही अाशा निर्माण झाली अाहे.


काय अाहे प्रकरण ?

गेल्या काही महिन्यांपासून सरस्वती मंदिर शाळेत अवाजवी शुल्क आकारण्यात येत होते. तसेच शुल्क भरण्यास ३ दिवस उशीर झाला म्हणून सरस्वती मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिकेने एका विद्यार्थ्यांचे अपेंडिक्सचे ऑपरेशन झाले असतानाही त्याला वर्गाबाहेर उभे राहण्याची शिक्षा केली होती. तर दुसऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतून काढण्यात आले होते. याविरुद्ध पालकांनी आवाज उठवत बालहक्क आयोगाकडे तक्रार केली. शिक्षण विभागाच्या अहवालात शाळेच्या मुख्याध्यापिका दोषी आढळल्या. त्याचसोबत शाळा पालकांकडून बेकायदेशीररित्या शुल्क आकारणी करत असल्याचेही समोर आले. त्यामुळे प्रशासनाकडून शाळेला कारवाईसाठी मुदत देण्यात आली होती. परिणामी शाळेकडून मुख्याध्यपिकाची हकालपट्टी करण्यात आली आहे.


पालकांनी जिंकलीय अर्धी लढाई

मुख्याध्यापिकेची हकालपट्टी शाळेने केली असली तरी पालकांचा शुल्क अाकारणीविरुद्ध लढा कायम राहणार अाहे. शाळा बेकायदेशीर पद्धतीने शुल्क वसुली करत असल्याचे अाम्ही निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे अजून आमची लढाई चालूच राहील, अशी माहिती पालकांनी दिली. डिसेंंबर २०१६ मध्ये बालहक्क आयोगाला तक्रार केल्यानांतर या पालकांना अर्धा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, त्यांच्या मुलांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचेही पालकांनी सांगितले. अखेर आयोगाने आणि शिक्षण विभागाने त्यांच्या लढ्याची दखल घेतली आणि शाळेला कारवाईच्या सूचना केल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा