शीव - अवघ्या 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रत्येकजण सज्ज झाला आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला भाषण, सांस्कृतिक कार्यक्रम शाळांमध्ये साजरे केले जातात. अशीच काहीशी तयारी प्रतीक्षानगर येथील कर्मवीर भाऊराव पाटील या विद्यालयात सुरु आहे. या शाळेतील विद्यार्थी रोज सकाळी लेझीमचा सराव करत आहेत.