Advertisement

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर

बारावीच्या फेरपरीक्षेला मुंबई, ठाणे, पालघर या भागातून एकूण २९ हजार ३२० विद्यर्थी बसले होते. बारावीची फेरपरीक्षा १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेसाठी बारावीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या अनेक विद्यर्थ्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल आज जाहीर
SHARES

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी २४ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल २४ ऑगस्टला दुपारी १ वाजल्यापासून विद्यर्थ्याना ऑनलाइन पाहता येणार आहे.

विद्यर्थ्यांचं भवितव्य पणाला

बारावीच्या फेरपरीक्षेला मुंबई, ठाणे, पालघर या भागातून एकूण २९ हजार ३२० विद्यर्थी बसले होते. बारावीची फेरपरीक्षा १७ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आली होती. या फेरपरीक्षेसाठी बारावीच्या नियमित परीक्षेत नापास झालेल्या अनेक विद्यर्थ्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.

'या' वेबसाईटवर पाहा निकाल

१) www.mahresult.nic.in

२) ww.resul.mkcl.org

३) www.maharashtraeducation.com

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा