स्कॉलरशीप परीक्षेची तारीख जाहीर

  Pali Hill
  स्कॉलरशीप परीक्षेची तारीख जाहीर
  मुंबई  -  

  मुंबई - शिक्षण हक्क कायद्यानुसार यंदा पहिल्यांदाच पाचवी आणि आठवीसाठी स्कॉलरश‌ीपची परीक्षा २६ फेब्रुवारीला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे .शिष्यवृत्ती परीक्षेबरोबरच विमुक्त जाती आणि भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश, शासकीय विद्यानिकेतन प्रवेशासाठी परीक्षा २६ फेब्रुवारीला होणार असून, यासाठी नोंदणी करताना आधार कार्ड क्रमांक सक्तीचा असल्याचं जाहीर करण्यात आले आहे. परिषदेतर्फे हे वेळापत्रक जाहीर करतानाच या परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणीसाठीही आवाहन केले आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह अंतिम मुदत ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार असून, www.mscepune.in संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना शाळांमार्फत नियमित मुदतीत ३१ डिसेंबरपर्यत शुल्क भरून अर्ज भरावा लागणार आहे. तसंच विलंब शुल्कासह ७ जानेवारीपर्यंत आणि अतिविलंब शुल्कासह परीक्षेच्या १५ दिवसांपूर्वी पर्यंत अर्ज भरता येणार आहे. शाळांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी परिषदेच्या संकेतस्थळावर सर्व परीक्षांविषयी सविस्तर माहिती उपलब्ध आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.