Advertisement

मुलांच्या पाठीवरील दप्तराचं अोझं होतंय कमी...


मुलांच्या पाठीवरील दप्तराचं अोझं होतंय कमी...
SHARES

मुलांचं वजन कमी अाणि दप्तराचं अोझं अधिक वजनाचं, हीच स्थिती अातापर्यंत दिसत होती. त्यावर अनेकांनी चौफेर टीकाही केली होती. अखेर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं हे दप्तराचं अोझं कमी करण्यात शासनाला यश मिळालं अाहे. नुकत्याच हाती अालेल्या अहवालानुसार दप्तराचं अोझं १२ टक्क्यांनी कमी झालं अाहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या पाठीवरचा भार कमी करण्यासाठी जूनमध्येच शालेय शिक्षणाकडून कठोर पावलं उचलण्यात अाली होती.


दप्तराच्या ओझ्यात १२ टक्के घट

जून ते सप्टेंबर या कालावधीत शिक्षण विभागाकडून तब्ब्ल २६३ शाळांतील ३६७५ विद्यार्थ्यांच्या दप्तरांच्या ओझ्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत ३२५९ विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं हे शासनाच्या नियमावलीत आणि मर्यादेत बसणारं होतं तर ४१६ विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं हे मर्यादेपेक्षा अधिक होतं.


उत्तर मुंबईतील विद्यार्थी अजूनही दप्तराच्या ओझ्याखाली

दप्तराच्या ओझ्यासाठी राज्यानं नेमून दिलेल्या नियमावलीनुसार विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं हे त्याच्या वजनाच्या १० टक्के इतकं असावे. उत्तर विभागातील ५१३ शाळांपैकी १०३ शाळांची तपासणी झाली. त्यात १८५२ विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याची तपासणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. उत्तर मुंबईच्या शाळांतील तपासणीत १६ टक्के विद्यार्थ्यांच्या पाठीवरील अोझं हे अधिक वजनाचं आढळून आलं. त्याउलट दक्षिण मुंबईत हे प्रमाण टक्के इतकंच होतं.


पश्चिम विभागातील ७२५ शाळांपैकी ११४ शाळांमधील १५२ विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी झाली. पश्चिम मुंबईतील १४ टक्के विद्यार्थी अजून दप्तराच्या ओझ्याखाली असल्याचे आढळले. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत दुसरी तपासणी होणार असून या तपासणीत आणखी सुधारणा होण्याची शक्यता अाहे.
- बी. बी. चव्हाण, मुंबई शिक्षण विभागाचे उपसंचालक

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा