Advertisement

राज्यातील ५ ते ८ वी च्या शाळा लवकरच होणार सुरू

५ ते ८वी वर्गाच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे.

राज्यातील ५ ते ८ वी च्या शाळा लवकरच होणार सुरू
SHARES

बुधवारी, ९ डिसेंबर रोजी शिक्षण विभागानं जाहीर केलं की, ५ ते ८वी वर्गाच्या शाळा पुन्हा सुरू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. पण राज्याच्या आरोग्य विभागानं मान्यता दिल्यानंतर याची अंमलबजावणी केली जाईल. या संदर्भातील माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.

राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था सध्या कोरोनामुळे बंद आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सरकार शाळा, महाविद्यालयं पुन्हा सुरू करण्यास तयार नाही. राज्य सरकारनं नुकतीच ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जिल्हाधिकारी आणि स्थानिक अधिकाऱ्यांना आपापल्या भागातील कोविडची स्थिती लक्षात घेऊन त्यावर निर्णय घेण्यास सांगितलं आहे.

वर्षा गायकवाड यांनी माध्यमांना संबोधित करताना सांगितलं की, शालेय शिक्षण विभाग पर्यायांचा विचार करीत आहे. लवकरच आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी यावर चर्चा करणार आहे. याव्यतिरिक्त, मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिकमधील शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत पूर्णपणे विचार केला जाईल. कारण कोविड १९ च्या रुग्णांमध्येवाढ होत आहे.

यासंदर्भात अधिकारी शाळा आणि पालकांपर्यंत पोहोचले आहेत. वृत्तानुसार पालिका वर्ग सुरू होण्यापूर्वी शिक्षकेतर कर्मचार्‍यांची आरटी-पीसीआर चाचणी घ्यावी लागेल. २३ नोव्हेंबर २०२० रोजी राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये पुन्हा सुरू झालेल्या शाळांमध्ये तीन लाखाहून अधिक विद्यार्थी सामील झाले आहेत.



हेही वाचा

महाविद्यालयांतील ७५ टक्के प्रवेश पूर्ण; आठवडाभरात ११वीचे वर्ग सुरू होण्याची शक्यता

आयआयटी मुंबईच्या ‘मूड इंडिगो’चं ५० वे वर्ष; ऑनलाईन होणार साजरा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा