Advertisement

दिवाळीची सुट्टी संपली, मुलांनो शाळा नवीन तासिकेनुसार भरणार!


दिवाळीची सुट्टी संपली, मुलांनो शाळा नवीन तासिकेनुसार भरणार!
SHARES

मुलांनो दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर आता पुन्हा शाळेत जायचा कंटाळा आला असेल ना?, पण तुमच्यासाठी आणखी एक चांगली बातमी आहे. कारण कला आणि शारीरिक शिक्षणाच्या 1-1 तासिका वाढवण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या शाळा या 48 तासिकानुसार भरवण्यात येतील.

शाळांमध्ये आतापर्यंत आठवड्याला 45 तासिका होत होत्या. त्या आता 48 तासिका होणार आहेत. मुबंईतील काही शाळा सोमवारपासून तर काही शाळा 3 तारखेपासून सुरू होत आहेत. शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी 45 ऐवजी 48 तासिका असाव्यात याचे परिपत्रक काढले होते. त्यात कला आणि शारीरिक शिक्षणाच्या तासिका वाढणार आहेत.


कला, शारीरिक शिक्षणाच्या 1-1 तासिका वाढणार

11 ऑक्टोबरला शिक्षण विभागाने या विषयी परिपत्रक काढले होते. त्यानुसार दिवाळीनंतर सुरू होणाऱ्या शाळेच्या पहिल्या दिवसापासून नवीन वेळापत्रक लागू करावे. असे सांगण्यात आले होते. त्यानुसार शिक्षकांना नवीन वेळापत्रक आखायचे आहे. नवीन वेळापत्रकानसार कला आणि शारीरिक शिक्षणच्या 1-1 तासिका वाढणार आहेत. मुलांमधील कलागुण जोपासण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता 8 तासिकांऐवजी 9 तासिका होणार आहेत.


28 एप्रिलच्या परिपत्रकाला होता विरोध

याआधी शिक्षण विभागाने 28 एप्रिलला परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकानुसार कला आणि शारीरिक शिक्षणाचे तास कमी करण्यात आले होते. या परिपत्रकाला मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. त्यानंतर शिक्षण विभागाने 11 ऑक्टोबरला नवीन परिपत्रक काढले. या परिपत्रकानुसार कला आणि शारीरिक शिक्षणाचे तास वाढवण्यात आले आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा