Advertisement

एफवायची दुसरी मेरिट लिस्ट जाहीर


एफवायची दुसरी मेरिट लिस्ट जाहीर
SHARES

अल्पसंख्यांक महाविद्यालयांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण देण्याबाबतची राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयानं शुक्रवारी फेटाळली. त्यानंतर शनिवारी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमा (एफवाय)ची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. 


गुणवत्ता यादी घसरली

यंदा नामांकित महाविद्यालयांची दुसरी गुणवत्ता यादी पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी कमी झाली आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या नामांकित कॉलेजांची प्रथम वर्षाची दुसरी गुणवत्ता यादी ७० ते ८५ टक्क्यांपर्यंत गेली असली तरी दुसऱ्या यादीमध्ये फार कमी विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.


अंतिम यादी कधी?

दुसऱ्या यादीनुसार प्रवेशासाठी किमान ७० ते ८० टक्के गुण आवश्यक असल्याचं चित्र दिसत आहे. १६ ते १८ जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना कागदपत्रं पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया करून आपले प्रवेश निश्चित करायचे असून एफवायची तिसरी आणि अंतिम यादी १८ जुलै रोजी जाहीर होणार आहे.


हेही वाचा -

अकरावीची दुसरी गुणवत्ता यादी १६ जुलैला

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा