Advertisement

सेट परीक्षेचा निकाल जाहीर


सेट परीक्षेचा निकाल जाहीर
SHARES

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सहायक प्राध्यापक पदांसाठीच्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेचा (सेट) आॅनलाईन निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. या परिक्षेसाठी एकूण ४ हजार ६७ विद्यार्थी पात्र ठरले असून, परीक्षेचा निकाल ६.५२ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सेटच्या निकालात २.६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल.


४ हजार ६७ विद्यार्थी पात्र

महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये २८ जानेवारी रोजी सेटची परीक्षा घेण्यात आली. या दोन्ही राज्यांतून एकूण ६२ हजार ४०४ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यांपैकी ४ हजार ६७ विद्यार्थी सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले आहेत. मागील वर्षी या परीक्षेचा निकाल ३.९२ टक्के लागला होता. यावर्षी त्यामध्ये २.६० टक्क्यांची वाढ झाली असून ६.५२ टक्के उत्तीर्णतेची टक्केवारी आहे.


म्हणून हा निकाल वाढला

विद्यापीठ अनुदान आयोगाने परीक्षेचा पॅटर्न बदलल्याने हा निकाल वाढला असल्याचं बोललं जात आहे. या परीक्षेतील तिन्ही पेपरना उत्तीर्णतेची अट बदलण्यात आली असल्याने त्यांना उत्तीर्ण होण्यासाठी सरासरी एवढे गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यामुळे यंदा पात्र विद्यार्थ्यांचं प्रमाणात वाढ झाली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा