Advertisement

७ जूनला दहावीचा निकाल ही अफवा, बोर्डाने केला खुलासा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळा (MSBSHSE) तर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या दहावी (SSC 10th Result 2019)च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

७ जूनला दहावीचा निकाल ही अफवा, बोर्डाने केला खुलासा
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळा (MSBSHSE) तर्फे जाहीर करण्यात येणाऱ्या दहावी (SSC 10th Result 2019)च्या निकालाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. ही तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. तोपर्यंत विद्यार्थी आणि पालकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे यांनी केलं आहे.  

बोर्डाकडून खुलासा

बारावीच्या निकालानंतर ७ जून रोजी दहावीचा निकाल लागणार अशा अफवा व्हाॅट्सअॅप, फेसबुक अशा सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांत फिरत होत्या. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागत असल्याने विद्यार्थी तसंच पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. त्यावर खुलासा करताना या बातम्या चुकीच्या असून त्यामध्ये काहीही तथ्य नसल्याचं मंडळाने स्पष्ट केलं.  

‘इथं’ बघा निकाल

मुंबई, पुणे, कोकण, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, नाशिक, कोल्हापूर अशा ९ विभागीय मंडळांतर्फे १ मार्च ते २२ मार्चदरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना maharashtraeducation.com , mahresult.nic.in आणि mahahsscboard.maharashtra.gov.in. या संकेतस्थळांवर पाहता येईल.

 

 


हेही वाचा-

NEET परीक्षेचा निकाल जाहीर; सार्थक भट राज्यात पहिला

MHT-CET निकाल जाहीर, मुंबईच्या किमया शिकारखानेला ९९.९८ टक्के


 

 

 

संबंधित विषय