Advertisement

NEET परीक्षेचा निकाल जाहीर; सार्थक भट राज्यात पहिला

एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (एनटीए) वतीने गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या NEET Results 2019 (नॅशनल इलिजीबिलिटी कम इंटरन्स टेस्ट) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला.

NEET परीक्षेचा निकाल जाहीर; सार्थक भट राज्यात पहिला
SHARES

एमबीबीएस आणि बीडीएस या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या (एनटीए) वतीने गेल्या महिन्यात घेण्यात आलेल्या NEET Results 2019 (नॅशनल इलिजीबिलिटी कम इंटरन्स टेस्ट) परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. या निकालात राजस्थानचा नलिन खंडेलवाल देशात टाॅपर ठरला. नलिनला ७२० पैकी ७०१ गुण मिळाले. तर महाराष्ट्रातून सार्थक भट याने ७२० पैकी ६९५ गुण मिळवत देशात सहावा येण्याचा मान मिळवला. मुलींमध्ये तेलंगणची माधुरी रेड्डी पहिली आली आहे. तिचा ‘ऑल इंडिया रँक’ सातवा आहे. माधुरीने ७२० पैकी ६९५ गुणांची कमाई केली.  

निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारावर कौन्सिलिंग आणि अंडरग्रॅज्युएट मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन घेता येणार आहे. विद्यार्थ्यांना आपले निकाल ntaneet.nic.in किंवा nta.ac.in वर पाहता येतील.  

NEET -2019 या परीक्षेसाठी देशभरातून १५,१९, ३७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ७,९७,०४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. ५ मे रोजी नीट परीक्षा घेण्यात आली होती. फॅनी वादळाच्या तडाख्यामुळे कर्नाटकातील विद्यार्थ्यांसाठी २० मे रोजी पुन्हा परीक्षा घेण्यात आली होती.  

‘नीट’चा निकाल जारी झाल्यानंतर मेडिकल कौन्सिलिंग कमिटी (MCC)च्या होमपेजवर नीट कौन्सिलिंग २०१९ ची यादी जाहीर करण्यात येणार आहे.   

 

'हे' आहेत देशातील टॉप १० रॅंकर  (७२० पैकी)

  • १ – नलिन खंडेलवाल – ७०१ (राजस्थान)
  • २ – भाविक बंसल – ७०० (दिल्ली)
  • ३ – अक्षत कौशिक – ७०० (उत्तर प्रदेश)
  • ४ – स्वास्तिक भाटिया – ६९६ (हरियाणा)
  • ५ – अनंत जैन – ६९५ (उत्तर प्रदेश)
  • ६ – सार्थक भट – ६९५ (महाराष्ट्र)
  • ७ – माधुरी रेड्डी जी – ६९५ (तेलंगण)
  • ८ – ध्रुव कुशवाहा – ६९५ (उत्तर प्रदेश)
  • ९ – मिहिर राय – ६९५ (दिल्ली)
  • १० – राघव दुबे – ६९१ (मध्य प्रदेश)



हेही वाचा-

वैद्यकीय शिक्षणात आरक्षण न मिळाल्यानं मराठा विद्यार्थ्यांचं आंदोलन



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा