Advertisement

SSC Result 2019: तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्यानं घसरला दहावीचा निकाल- विनोद तावडे

दहावीच्या परीक्षेचा निकाल राज्यात यंदा एकूण निकाल ७७.१० टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल १२ टक्क्यांनी घसरला आहे. 'तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्यानं निकालाचा टक्का घसरला आहे, असं तावडेंनी म्हटलं आहे.

SSC Result 2019: तोंडी परीक्षेचे गुण कमी केल्यानं घसरला दहावीचा निकाल- विनोद तावडे
SHARES

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवार ८ जून रोजी जाहीर करण्यात आला. यावर्षी राज्याचा एकूण निकाल ७७.१० टक्के लागला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत निकाल १२ टक्क्यांनी घसरला आहे. मात्र, निकालाची टक्केवारी घसरल्यानं शैक्षणिक क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. त्यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी प्रतिक्रिया दिली. 'तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्यानं दहावीच्या निकालाचा टक्का घसरला. मात्र विद्यार्थ्यांना त्यांचे खरे गुण कळाले. त्यामुळं त्यांना पुढची दिशा ठरवता येईल’, असं तावडे यांनी म्हटलं.

१२ टक्क्यांनी कमी

'दहावीचा निकाल १२ टक्क्यांनी कमी झाल्यानं पालक, शिक्षण तज्ज्ञांना विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची चिंता सतावू लागली आहे. मात्र,२००७ पर्यंत तोंडी परीक्षा नव्हतीतेव्हाही निकाल एवढाच लागायचा२००८ ते २०१८ या काळात तोंडी परीक्षा आणि त्याचे गुण शाळेकडून मिळायचे. त्यामुळं दहावीचा टक्का एकदम १६ टक्यांनी वाढला होता’, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे म्हणाले.

दहावीचा टक्का घसरला

'आता तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्यानं पुन्हा दहावीचा टक्का घसरला आहे. परंतु, विद्यार्थ्यांचे खरे गुण त्यांना कळाले आहेत. त्यामुळं त्यांना आता पुढची दिशा आताच ठरवता येईल. कारण आधी १० वीत चांगले गुण मिळाले की, ११ ला प्रवेश घेऊन शिक्षण पूर्ण करायचे. मग बेरोजगराच्या कारखान्यात भरती व्हायचे. मात्र आता असं होणार नाही, विद्यार्थ्यांना खरे गुण मिळाल्यानं त्यांना योग्य शैक्षणिक निर्णय घेता येईल. त्याचप्रमाणं दहावीच्या निकालांमध्ये ज्यांना कमी गुण मिळले आहेत. त्यांना या महिन्यात अभ्यास करून फेरपरीक्षा देता येईल, नाहीतर कौशल्य विकास अभ्यासक्रमात प्रवेश घेता येईल. त्यामुळं मार्क कमी मिळले म्हणून निराश होऊ नका, असा सल्लाही शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी दिला.



हेही वाचा -

गुड न्यूज, १ जुलैपासून एसबीआयचं गृहकर्ज होणार स्वस्त

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: पायलनं लेखी तक्रार केलेली नाही



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा