Advertisement

गुड न्यूज, १ जुलैपासून एसबीआयचं गृहकर्ज होणार स्वस्त

रिझर्व्ह बँकेने रेपो दरांत पाव टक्के कपात केल्यानंतर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँके (SBI)ने कर्जदरांत ०.२५ टक्क्यांची कपात करत आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे.

गुड न्यूज, १ जुलैपासून एसबीआयचं गृहकर्ज होणार स्वस्त
SHARES

रिझर्व्ह बँकेने रेपो दरांत पाव टक्के कपात केल्यानंतर देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या भारतीय स्टेट बँके (SBI)ने कर्जदरांत ०.२५ टक्क्यांची कपात करत आपल्या ग्राहकांना दिलासा दिला आहे. इतर बँकांच्या तुलनेत एसबीआयने सर्वांत पहिल्यांदा व्याजदारात कपात केली आहे. त्यामुळे बँकेचे गृहकर्ज, वाहन कर्ज इ. कर्जे स्वस्त होणार आहेत.

देशातली पहिली बँक

एसबीआयने मार्च २०१९ मध्येच सेव्हिंग डिपाॅझिट आणि कर्जांना आरबीआयच्या रेपो रेट सोबत जोडण्याची घोषणा केली होती. एक्स्टर्नल बेंचमार्किंग नियमांतर्गत रेपो रेटला बँकेच्या व्याजदारांशी जोडणारी एसबीआय ही पहिली बँक ठरली आहे.

त्यानुसार आरबीआयने रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करताच एसबीआयच्या मुदत ठेवी आणि कर्जांच्या व्याजदरांतही ०.२५ टक्क्यांची कपात झाली आहे. १ जुलैपासून बँकेची १ लाख रुपयांवरील कर्जे ०.२५ टक्क्यांनी स्वस्त होतील.  

रेपो रेट म्हटजे काय?

रिझर्व्ह बँकेने गुरूवारी सलग तिसऱ्यांदा रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात करत रेपो रेट ५.७५ टक्क्यांवर आणले आहेत. दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठ्या रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचं कर्ज देते. या अल्प मुदतीच्या कर्जावर जो व्याजदर आकारला जातो त्याला रेपो रेट म्हणतात.



हेही वाचा-

विप्रोचे अझीम प्रेमजी जुलैत होणार निवृत्त

RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा