Advertisement

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: पायलनं लेखी तक्रार केलेली नाही

अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या स्वाक्षरीचा अहवाल स्थायी समितीत सादर करण्यात आला. डॉ. पायल किंवा त्यांच्या नातेवाईकांनी नायर रुग्णालयाच्या कार्यालयात कोणतीही लेखी तक्रार केलेली नसल्याचं अहवालात नमूद केलं आहे.

डॉ. पायल आत्महत्या प्रकरण: पायलनं लेखी तक्रार केलेली नाही
SHARES

डॉपायल तडवी आत्महत्या प्रकरणाचे तीव्र पडसाद २४ मेच्या स्थायी समितीत उमटले होतेत्यामुळं अतिरिक्त आयुक्तउपायुक्त व नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या स्वाक्षरीचा अहवाल शुक्रवारी स्थायी समितीत अहवाल सादर करण्यात आलाडॉपायल किंवा त्यांच्या नातेवाईकांनी नायर रुग्णालयाच्या कार्यालयात कोणतीही लेखी तक्रार केलेली नसल्याचं या अहवालात नमूद केलं आहेदरम्यान ५ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली असून यामध्ये अनुसूचित जमातीच्या एका सदस्याची नेमणूक करण्यात आली आहे. याचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश या अहवालामध्ये देण्यात आले आहेत.


आत्महत्या प्रकरण

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. भक्ती मेहेर यांना अटक केली. त्यानंतर या प्रकरणाची प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं वैद्यकीय शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीनं चौकशी अहवाल सरकारला सादर केला आहे. या अहवलात डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. भक्ती मेहेर यांनी डॉ. पायलचा छळ केल्याचा निष्कर्ष काढण्यात आला असल्याची माहिती मिळते. त्याशिवाय, हा अहवाल वैद्यकीय शिक्षण विभागासह महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठालाही पाठविण्यात आलेला आहे.


५० जणांचे जबाब

या समितीनं नायर रुग्णालय प्रशासनासह, डॉ. पायलचे सहकारी, रुग्णालयातील कर्मचारी, प्राध्यापक आणि तिचे नातेवाईक तसंच, आरोपींचे पालक अशा जवळपास ५० जणांचे जबाब नोंदविले आहेत. या सर्व जबाबांची पुस्तिका, सीडी आणि अहवालाची प्रत वैद्यकीय शिक्षण विभाग आणि राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाला पाठविण्यात आली आहे. डॉ. पायल यांचा छळ झाल्याचा निष्कर्ष अहवालात काढण्यात आल्याचं समजतं आहे. परंतु, या अहवालात तिन्ही महिला डॉक्टरांवर कोणती कारवाई करावी याबाबत अस्पष्टता ठेवण्यात आल्याचं समजतं आहे.

राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगानं देखील डॉ. पायल तडवी प्रकरणाची दखल घेतली असून, आयोगाचे आयुक्त नंदकुमार साय हे शनिवारी नायर रुग्णालयासह आरोग्य विभागाचे मुख्य सचिव, सचिव आणि पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहेत.


तिन्ही डॉक्टरांचे जबाब

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात अटकेतील तिन्ही महिला डॉक्टरांचे जबाब गुन्हे शाखेने शुक्रवारी नव्याने नोंदवून घेतले. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शुक्रवार ते रविवार या तीन दिवसांत गुन्हे शाखा सकाळी ९ ते संध्याकाळी ६ या वेळेत आरोपी महिलांकडे चौकशी करू शकणार आहे. त्यानुसार शुक्रवारी भायखळा येथील महिला कारागृहातून डॉ. भक्ती मेहर, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. हेमा आहुजा यांना नागपाडा येथील सहायक आयुक्त कार्यालयात आणण्यात आले आणि त्यांचे जबाब नोंदवण्यात आले.


निषेध मोर्चा

डॉ. पायलला आत्महत्येसाठी प्रवृत्त केलेल्या आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करत विविध संघटनांनी निषेध मोर्चाचं आयोजन केलं आहे. सोमवारी १० जून रोजी या मोर्चाचं आयोजन केलं असून, मुंबई विद्यापीठ ते वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गानं जाणाऱ्या या मोर्चामध्ये राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, राष्ट्रीय आदिवासी छात्र संघ, राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती इत्यादी संघटना सहभागी होणार आहेत.हेही वाचा -

मनसे मोदींना पाठवणार १० हजार पोस्ट कार्ड, मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आक्रमक

अबब! चरण-एनटीआरचे ४५ कोटींचे फाइट सिक्वेन्ससंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा