Advertisement

मनसे मोदींना पाठवणार १० हजार पोस्ट कार्ड, मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आक्रमक

अभिजात मराठीच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० हजार पोस्ट कार्ड पाठवण्याचा निश्चय करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे.

मनसे मोदींना पाठवणार १० हजार पोस्ट कार्ड, मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी आक्रमक
SHARES

मराठी भाषेने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी सर्व निकष पूर्ण करूनही केंद्र सरकार मराठीला दर्जा देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे. त्यामुळे मराठी जनतेच्या भावना केंद्र सरकारकडे पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १० हजार पोस्ट कार्ड पाठवण्याचा निश्चय करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा हाती घेतला आहे. 

नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी पत्रक काढत केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी तसंच मराठीला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी मनसेने ही पोस्टकार्ड मोहीम सुरू केल्याचं म्हटलं आहे.


या पत्रकात नमूद केल्यानुसार, तामिळसह संस्कृत, तेलगु, कन्नळ, मल्ल्याळम, ओडीआ अशा ६ भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. त्यानुसार मराठीने अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासंदर्भातील सर्व निकष पूर्ण करून साडेचार वर्षे उलटली आहेत. सर्व पुरावे, कागदपत्रे सादर केली आहेत. केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या भाषा तज्ज्ञांनीही मराठीच्या बाजूने शिफारस केली आहे. असं असूनही केंद्र सरकार ही घोषणा करायला टाळाटाळ करत आहे. राज्य सरकार देखील या मागणीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करत नसल्याने हा प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे राज्यातील जनतेने या मोहिमेला पाठिंबा देऊन आपल्या भावना व्यक्त करणारं पत्रं मोदींना पाठवावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे. 



हेही वाचा-

उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येला गेले, तरीही राम मंदिर होणार नाही- रामदास आठवले

काँग्रेसला नकोय राष्ट्रवादीची साथ, स्वबळावर लढवणार निवडणूक ?



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा