दहावीचा निकाल मंगळवारी लागणार!

 Mumbai
दहावीचा निकाल मंगळवारी लागणार!

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी/ मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल मंगळवारी 13 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या चुकीच्या तारखा फिरत होत्या. अखेर राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी मंडळाकडे आवेदन पत्रे भरली होती. राज्य शासनाने अध्यादेश काढून चित्रकला, संगीत आदी कला विषयांच्या गुणांचा समावेश दहावीच्या गुणपत्रिकेत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, ऐनवेळी कलागुणांची नोंद करावी लागल्याने दहावीचा निकाल लावण्यास विलंब लागल्याचे सांगण्यात येत आहे.

या संकेतस्थळांवर पहा तुमचा निकाल
- www.mahresult.nic.in
- www.sscresult.mkcl.org
- www.maharshtraeducation.com
- www.knowyourresult.com
- www.rediff.com/exam
- 
www.jagranjosh.com

तुम्ही आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा, बीएसएनएलधारक असाल तर 58888111 या नंबरवर MAH10 ( स्पेस) द्या आणि तुमचा नंबर टाका. तुमच्या मोबाईवरच निकाल कळू शकेल.

Loading Comments