Advertisement

RTI अंतर्गत मिळू शकते उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी, विद्यापीठाची टाळाटाळ


RTI अंतर्गत मिळू शकते उत्तर पत्रिकेची फोटोकॉपी, विद्यापीठाची टाळाटाळ
SHARES

माहिती अधिकाराअंतर्गत तुम्ही तुमच्या उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी मागू शकता! हे तुम्हाला माहिती होतं का? अर्थात, हे माहिती असण्याचं काही कारण नाही. कारण एक तर स्वत: मुंबई विद्यापीठाकडून ही माहिती सांगितली जात नाही, कुणाला माहिती असेल तरी विद्यापीठाच्या प्रक्रियेनुसारच अर्ज करायला लावले जातात, आणि तिसरं म्हणजे २०११ मध्ये सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भात दिलेला निर्णय फारसा कुणाला माहिती नाही म्हणून.


नक्की काय आहे प्रकार?

हा प्रकार आकाश वेदक या आरटीआय कार्यकर्त्यामुळे समोर आला आहे. २०११ साली सुप्रीम कोर्टाने आरटीआय अंतर्गत उत्तरपत्रिका मिळवण्यासंदर्भात निर्णय दिला होता. या आधारावर आकाशने विद्यापीठात उत्तरपत्रिकेसाठी विचारणा केली. विद्यापीठाने मात्र 'नियमित प्रक्रियेनुसारच अर्ज करा' असे आकाशला सांगितले.

दरम्यान, आकाशला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयासंबंधी माहिती असल्यामुळे त्याने संबंधित कर्मचाऱ्याला तशी विचारणा केली. तेव्हा कुठे या कर्मचाऱ्याने आकाशच्या माहिती अधिकारातील अर्जानुसार उत्तरपत्रिकेची फोटोकॉपी देण्याचे मान्य केले आणि तेही ३० दिवसांत!
विद्यापीठाचा माहिती अधिकाराला आक्षेप का?

मुळात विद्यार्थ्यांनी फोटोकॉपीची मागणी विद्यापीठाच्या अर्जानुसार केली असती, तर ठराविक मुदतीत फोटोकॉपी मिळण्याचं बंधन विद्यापीठावर नसतं. त्यामुळे आकाशला नक्की कधी ही फोटोकॉपी मिळाली असती, याविषयी काहीच शाश्वती नसती. मात्र, माहिती अधिकारात आकाशने अर्ज केल्यामुळे आता ३० दिवसांच्या आत ही फोटोकॉपी देणे विद्यापीठाला बंधनकारक असेल.


सुरुवातीला मला विद्यापीठाने माहीती अधिकारा अंतर्गत छायांकीत प्रत देण्यास नकार दिला. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासंबंधी सांगितल्यानंतर विद्यापीठ तयार झाले. या आधी विद्यार्थ्यांना याबबात माहिती दिली जात नव्हती, पण आता इतरही विद्यार्थी माहिती अधिकाराचा वापर करू शकतात.

आकाश वेदक, आरटीआय कार्यकर्ता


काय आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय?

१. २०११ च्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना माहिती अधिकारांतर्गत छायांकित प्रत मागण्याचा अधिकार आहे
२. प्रत्येक पान २ रूपये याप्रमाणे विद्यार्थी छायांकित प्रत मागवू शकतो
३. विद्यार्थ्याला ३० दिवसांच्या आत छायांकित प्रत मिळणे बंधनकारक आहेहेही वाचा

ऑनलाईन पेपर तपासणीचा गोंधळ कि घोटाळा?


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा