• अस्मिता शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी
  • अस्मिता शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी
  • अस्मिता शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी
SHARE

जोगेश्वरी -  अस्मिता शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणूक गुरुवारी सकाळी 7 ते 10 या वेळेत शाळेच्या मैदानातून निघणार असून जोगेश्वरी प्रतापनगर, शिव टेकडी, जोगेश्वरी स्टेशन या ठिकाणी फिरणार आहे. यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. ढोल-ताशा पथक,पथनाट्य याची तालीम विद्यार्थ्यांनी सुरु केली आहे. तसंच शाळेची साफसफाई, रांगोळी काढणे याचीही तयारी विद्यार्थ्यांनी केली आहे. मिरणूकीदरम्यान चित्ररथ, लेझीम पथक ढोल ताशा पथक, पथनाट्य, दोराचा मल्लखांब, घोष पथकाचा सहभाग तसंच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभाग घेणार आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या