Advertisement

१२ वीची पुस्तकं बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध

बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बारावी अभ्यासक्रमाचं संपूर्ण साहित्य पीडिएफ(PDF)च्या स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलं आहे.

१२ वीची पुस्तकं बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध
SHARES

बारावीच्या (HSC) विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी बारावी अभ्यासक्रमाचं संपूर्ण साहित्य पीडिएफ(PDF)च्या स्वरुपात http://www.ebalbharati.in/ या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. यामुळे बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘लर्न फ्रॉम होम’ (learn from home) म्हणजेच घरी असतानाही आपला अभ्यासक्रम पूर्ण करता येईल.  

अभ्यासाचे वेगवेगळे पर्याय

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याआधीच नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना दुकानांमधून उपलब्ध होत असतात. परंतु सध्या कोरोना विषाणूचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी (lockdown) असल्यामुळे ही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास अडचण निर्माण झाली आहे. या कालावधीत अभ्यासक्रमाचे ई साहित्य बालभारतीच्या वेबसाईटवर उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांना घरी बसून अभ्यास करता येणार आहे. याच बरोबर रेडिओ, टिव्हीच्या माध्यमातून अभ्यासाचं साहित्य उपलब्ध करुन देण्याबाबत देखील पडताळणी सुरु आहे. यासंदर्भात शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड (education minister varsha gaikwad) यांनी नुकतीच राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची  झूम ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन  बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्या होता.

हेही वाचा- आता घरच्या घरीही करता येईल अभ्यास, शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘लर्न फ्राॅम होम’ योजना

ऑनलाईन उपलब्ध करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये मराठी. हिंदी, संस्कृत या सोबतच गणित, विज्ञान, तर्कशास्त्र. माहिती व तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या सर्व पुस्तकांची यादी खालील प्रमाणे आहे.

‘ही’ आहेत पुस्तके

युवकभारती मराठी (मराठी), संस्कृत – अल्हाद (संस्कृत), पाली-पकासो (मराठी), अर्धमागधी- प्राकृत (मराठी), महाराष्ट्रीय प्राकृत (मराठी), युवकभारती – हिंदी (हिंदी),  युवकभारती – बंगाली (बंगाली),  युवकभारती – इंग्रजी  (इंग्रजी) युवकभारती – गुजराती (गुजराती), युवकभारती – उर्दू (उर्दू), युवकभारती– सिंधी (अरेबिक), युवकभारती – सिंधी (देवनागरी), युवकभारती- कन्नड (कन्नड) युवकभारती - तेलुगू (तेलुगू), शिक्षणशास्र (मराठी, इंग्रजी),  पर्शियन – गुल्हा ए फारशी (उर्दू), अरेबिक- हिदायतुल अरेबिया (उर्दू), तर्कशास्र (इंग्रजी), बालविकास    (इंग्रजी), भौतिकशास्र (इंग्रजी), रसायनशास्र (इंग्रजी), जीवशास्र (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग १) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (कला व विज्ञान भाग २) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग १) (इंग्रजी), गणित व संख्याशास्र (वाणिज्य भाग २) (इंग्रजी), पुस्तपालन व लेखाकर्म (मराठी, इंग्रजी), सहकार (मराठी, इंग्रजी), वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (मराठी, इंग्रजी), चिटणीसाची कार्यपद्धती (मराठी/इंग्रजी), अर्थशास्र (मराठी/इंग्रजी), जलसुरक्षा व पर्यावरण शिक्षण (मराठी/ इंग्रजी), इतिहास (मराठी), राज्यशास्र (मराठी/इंग्रजी), माहिती तंत्रज्ञान – विज्ञान (इंग्रजी).

हेही वाचा - MPSC पूर्व परीक्षाही पुढे ढकलल्या


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा