Advertisement

शिक्षक दिन: शिक्षक-विद्यार्थी नात्याचा बदललेला परिघ

मनमोकळ्या संवादातून शिक्षण आणि विद्यार्थ्यांमध्ये मित्रत्वाचं नातं उलगडताना दिसत आहे. सध्याचे विद्यार्थी आपल्या अनेक अडचणी किंवा समस्या पालकांपूर्वी शिक्षकांपुढे मंडतात. त्यांचाशी त्यावर चर्चा करतात, संवाद साधतात आणि या सर्वातून शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतात. यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थी आणि शिक्षकांमधील वृद्धींगत होत चाललं आहे.

शिक्षक दिन: शिक्षक-विद्यार्थी नात्याचा बदललेला परिघ
SHARES

आपल्या संस्कृतीत आईनंतर दुसरं महत्त्वाचं स्थान असतं ते गुरूला. आपल्या जीवनाला दिशा देण्यात आणि आपली जडणघडण करण्यात गुरूचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळेच आपल्याकडं शिक्षक दिनाला विशेष महत्त्व आहे. खरंतर याच दिवशी बरेच विद्यार्थी आपल्या गुरुजनांबद्दल आदराची आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. 'शिक्षक' हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. परंतु बदलत्या काळानुसार गुरू शिष्याचं नात्याचे संदर्भही बदलत चालले आहेत.


आठवते छडी

आमच्या काळात शिक्षक म्हटले की आठवते ती त्यांची छडी! त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षकांबद्दल प्रचंड आदर तर होताच; पण त्यांची भीतीही तेवढीच वाटायची. त्यामुळं कोणत्याही शिक्षकांसमोर कस बोलायचं हा पेच निर्माण व्हायचा. एवढंच काय तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या मर्यादेत राहायला हवी अशी त्यावेळीची शिक्षकांची भूमिका असायची. त्याशिवाय कोणत्याही विद्यार्थ्यांने प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्न केला, तर त्याची काही खैर नसायची.


नात्यात बदल

परंतु सध्याच्या वातावरणात शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आदरयुक्त भीतीची रेषा पुसट होत चालली आहे. बदलत्या शिक्षण पद्धतीमुळं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातलं नातंही बदलत चाललं आहे. शिक्षकांनीही आपल्या भूमिकेत बदल केला आहे. शिक्षकांमध्ये झालेले बदल जुन्या विचारसरणीचे पालक व शिक्षकांना न रुचणारे असले तरीदेखील हे बदल आजच्या शिक्षण प्रणालीत अनिवार्य आहेत.



शिक्षक नव्हे, मित्र

विद्यार्थी व शिक्षक यांच्यातील मनमोकळ्या संवादामुळे आजकाल विद्यार्थ्यांना शिक्षक आपले मित्र वाटू लागले आहेत. आपल्याशी मनमोकळ्या गप्पा मारणाऱ्या शिक्षकांबद्दल विद्यार्थ्यांना आपुलकी वाटते. परिणामी विद्यार्थी आपल्या मनातील शंका, आपल्या भावना बिनधास्तपणे शिक्षकांना सांगत असल्याने ज्ञान प्रदान करण्याची प्रक्रिया सुलभ व आनंददायी झाली आहे.


मनमोकळा संवाद

एखाद्या दिवशी अभ्यासाचा खूप ताण आल्यावर किंवा अभ्यासाची मानसिकता नसल्यावर आजचा विद्यार्थी सहज म्हणून जातो," सर आज खूप अभ्यास झालाय , शिकवलेलं सगळ डोक्यावरून जातंय; आजच्या दिवस खेळायला जाऊयात." "मला शिकवलेलं काहीही समजलं नाही मला परत एकदा समजून सांगा", " सर, आज आपण असा प्रयोग करू.", "या पद्धतीने गणित सोडविण्याएवजी असं सोडवलं तर काय होईल." यासारखे अनेक संवाद वर्गांमध्ये सातत्याने निदर्शनास येत आहेत.

या मनमोकळेपणातूनच दोघांमध्ये मित्रत्वाचं नातं उलगडताना दिसत आहे. सध्याचे विद्यार्थी आपल्या अनेक अडचणी किंवा समस्या पालकांपूर्वी शिक्षकांपुढे मंडतात. त्यांचाशी त्यावर चर्चा करतात, संवाद साधतात आणि या सर्वातून शिक्षक विद्यार्थ्यांना योग्य दिशा दाखवतात. यामुळे दिवसेंदिवस विद्यार्थी आणि शिक्षकांमधील वृद्धींगत होत चाललं आहे.


संस्कारक्षम पिढी घडवली

याचा अर्थ असा नाही की पूर्वीचे शिक्षक दर्जेदार नव्हते. संस्कारक्षम पिढी घडविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्यासाठी आवश्यक अध्यापन पद्धतीचा त्यांनी योग्य तऱ्हेने स्वीकार केला होता. त्यात काही गैरही नव्हते. उलट त्यावेळी भारतीय समाजव्यवस्थेची बिघडलेली घडी व्यवस्थित बसविण्यासाठी तत्कालीन शिक्षकांनी अंगीकारलेली पद्धती त्या काळाला साजेशी तर होतीच किंबहुना ती त्या काळाची गरजच होती.


बदत्या समाजाच्या गरजा

परंतु आता समाजाच्या व देशाच्या गरजा बदलत आहेत. आजच्या विद्यार्थ्यांकडून देशाच्या अपेक्षा वाढल्या असून विद्यार्थ्यांमधून कारकून निर्माण करण्यापेक्षा शास्त्रज्ञ, उद्योजक घडविण्याचे ध्येय आजच्या शिक्षण पद्धतीने ठरवून दिले आहे. यकारिता विद्यार्थ्यांच्या सर्व शंकाचं निरसन लहान वयातच होणं अनिवार्य आहे, त्यांच्यामध्ये संशोधक वृत्ती जोपासण्यासाठी त्यांच्या सर्व प्रश्नांची उकल त्यांना होणं आवश्यक आहे, शिक्षकांशी त्यांचं वर्तन जर मित्रत्वाचं असेल तरच आपल्या सर्व शंकाचे निरसन ते करून घेऊ शकतात. ही भावना शिक्षकांमध्ये वाढीस लागली आहे.  



हेही वाचा-

कॉलेज शिक्षकांची ११ सप्टेंबरला कामबंदची हाक

राज्यातील कॉलेज शिक्षकांची जेलभरो आंदोलनाची हाक!



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा