Advertisement

कॉलेज शिक्षकांची ११ सप्टेंबरला कामबंदची हाक

४ सप्टेंबरला मुंबईत जेलभरो आंदोलन करावं लागलं. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) तर्फे मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये हे जेलभरो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्याने मंगळवारी ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवस काम बंद आंदोलनाची हाक 'एमफुक्टो'तर्फे देण्यात आली आहे.

कॉलेज शिक्षकांची ११ सप्टेंबरला कामबंदची हाक
SHARES

महाराष्ट्रात ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून ओळखला जातो. मात्र याच शिक्षकांना त्यांच्या हक्कासाठी शिक्षकदिनाच्या आदल्या दिवशी म्हणजे ४ सप्टेंबरला मुंबईत जेलभरो आंदोलन करावं लागलं. महाराष्ट्र प्राध्यापक महासंघ (एमफुक्टो) तर्फे मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसमध्ये हे जेलभरो आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास १००० ते १५०० शिक्षक यात सहभागी झाले होते. मात्र या आंदोलनाची दखल राज्य सरकारने न घेतल्याने मंगळवारी ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवस काम बंद आंदोलनाची हाक 'एमफुक्टो'तर्फे देण्यात आली आहे.


नेमक्या मागण्या काय?

महाराष्ट्र शासनानं २५ मे २०१७ साली जाहीर केलेल्या शासन निर्णयामुळं सध्या संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक भरतीवर पूर्णपणं बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं सध्या विविध कॉलेजमध्ये कंत्राटी पदावर शिक्षकांची भरती केली जात असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या सरकारी सुट्ट्या, नियमित वेतन, पेन्शन यांसारख्या गोष्टींची सुविधा दिली जात नाही. तसंच या सर्व शिक्षकांना फक्त ६ हजार ते १८ हजार किंवा तासिका तत्वावर प्रती तास ३०० रुपयांप्रमाणे वेतन दिलं जातं.


निर्णयाची अंमलबजावणी व्हावी

याशिवाय एका शिक्षकाला १२० ते १३० विद्यार्थ्यांचे पेपर सेट करणं, तपासणं यांसारखीही काम करावी लागतात. त्यामुळं समान काम-समान वेतन या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी लवकरात लवकर करत त्यांना पूर्णवेळ शिक्षकांप्रमाणे कंत्राटी शिक्षकांनाही सरकारी सेवेत समाविष्ट करण्यात यावं ही प्रमुख मागणी 'एमफुक्टो'च्या वतीनं शासनाला करण्यात येत आहे.


पेन्शन योजना

त्याशिवाय राज्यातील शिक्षकांच ७१ दिवसाचं वेतन त्वरित देऊन सर्व ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण संचालक यांच्यासह सर्व शिक्षकांना सातव्या वेतन आयोगातील सर्व शिफारसी लागू कराव्यात. तसच जुनी पेन्शन योजना सुरू करून नवी पेन्शन योजना बंद करावी, तसचं युजीसाच्या नियमानुसार सर्व शिक्षकांना सेवानिवृत्तीचं वय वाढवून द्यावं ही मागणीही यावेळी करण्यात आली.


कायमस्वरूपी नोकरी

त्याशिवाय महाराष्ट्रात नेट व सेट या परीक्षा दिलेले लाखो विद्यार्थी सध्या नोकरी नसल्यानं कंत्राटी पदवार काम करत आहे. तसचं हे सर्व शिक्षक अवघा १० ते २० हजार वेतन घेत असून जवळपास १२० ते १३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक काम करत आहे. विशेष म्हणजे युजीसीच्या नियमावलीनुसार, प्रत्येक एक शिक्षकामागे फक्त २० विद्यार्थी असं गुणोत्तर प्रमाण असूनही शासनस्तरावर त्याची मान्यता करण्यात येत नसल्याची परिस्थितीही 'एमफुक्टो'च्या वतीनं मांडण्यात आली.


नुकत्याच झालेल्या 'एमफुक्टो'च्या जेलभरो आंदोलनानंतर बुधवारपासून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सार्वजनिक कार्यक्रमात शिक्षक आपल्या मागण्यांसाठी शांततामय आंदोलन करणार आहेत. त्यानंतर मंगळवारी ११ सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसीय काम बंद आंदोलनाची हाकही 'एमफुक्टो'तर्फे देण्यात आली आहे. आणि एवढ करूनही जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मात्र २५ सप्टेंबरपासून अनिश्चित काळासाठी काम बंद आंदोलन करण्यात येईल.
- प्रा. डॉ. तपती मुखोपाध्याय, अध्यक्ष, एमफुक्टो



हेही वाचा-

राज्यातील कॉलेज शिक्षकांची जेलभरो आंदोलनाची हाक!

आयडॉलच्या प्रवेशासाठी १५ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा