Advertisement

शिक्षकही होणार कवी...


शिक्षकही होणार कवी...
SHARES

दैनंदिन अध्यापनाच्या व्यतिरिक्त अनेक शिक्षक लेखन करत असतात अशा शिक्षकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ मिळून प्रोत्साहन मिळावं, यासाठी मराठी राजभाषा दिनानिमित्त मंगळवारी २७ फेब्रुवारीला शिक्षक कवी संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. 

शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई उत्तर विभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनात उत्तर विभागातील शिक्षक सहभागी होणार असल्याचं शिक्षण निरीक्षक डॉ. मुश्ताक शेख यांनी सांगितलं.


कुठे होणार कार्यक्रम?

विद्याविहार येथील एस के सोमय्या विनयमंदिर हायस्कुल आणि ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात दुपारी २ वाजता कवी सतीश सोळंकुरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे कवी संमेलन होणार आहे. यामध्ये कविवर्य कुसुमाग्रजांच्या कविता आणि साहित्यकृतीचे सादरीकरण शिक्षकांकडून केलं जाणार आहे. मराठी भाषेला लवकरच अभिजात भाषेचा दर्जादेखील मिळणार आहे. त्याबाबत सतीश सोळंकुरकर शिक्षकांशी संवाद साधणार आहे. तसेच यावेळी शिक्षक आपल्या स्वरचित आणि मान्यवर कवींच्या कवितांचं वाचन करतील.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा