Advertisement

'एमएचटी सीईटी' परीक्षेची गुणपद्धती जाहीर


'एमएचटी सीईटी' परीक्षेची गुणपद्धती जाहीर
SHARES

the quality of mhet cet is announced

अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी एमएचटी सीईटी घेतली जाते. त्यासाठी राज्य सामाईक परीक्षा कक्षाच्या वतीनं एमएचटी सीईटी परीक्षेची गुणपद्धती जाहीर करण्यात आली आहे. अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमांवर आधारित ही परीक्षा होणार आहे. यंदाही परीक्षा ऑनलाइन होणार आहे. त्याशिवाय, गणिताचा पेपर १०० गुणांचा असणार असून, अन्य २ विषय हे ५० गुणांचे असणार आहेत.

९० मिनिटांचा कालावधी

गणिताचा पेपर १०० गुणांचा असणार आहे. यामध्ये अकरावीच्या अभ्यासक्रम आधारित १० गुणांचे प्रश्‍न असणार आहेत. प्रत्येक प्रश्‍नाला २ गुण असणार आहेत. प्रश्‍नपत्रिका सोडवण्यासाठी ९० मिनिटांचा कालावधी असणार आहे. त्याचबरोबर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र हे ५० गुणांचे असणार आहेत. यातही अकरावीच्या अभ्यासक्रमावर आधारित १० गुणांचे प्रश्‍न आणि बारावीच्या अभ्यासक्रमावरील ४० गुणांचे प्रश्‍न असणार आहेत.

५० गुणांचा पेपर

या विषयांना प्रत्येक प्रश्‍नासाठी १ गुण आहे. जीवशास्त्र आणि जीवशास्त्र (प्राणीशास्त्र) यासाठी ५० गुणांचा पेपर असणार आहे. यासाठीही १०:४० असाच पॅटर्न असणार आहे. यंदा एप्रिल मध्ये होणाऱ्या या परीक्षेसाठी गुणपद्धत कशी असणार याबाबत अधिसूचना संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

पर्सेन्टाइल गुण

जे विद्यार्थी पीसीबी आणि पीसीएम या दोन्ही गटांमधून परीक्षा देणार असतील तर पर्सेन्टाइल गुण काढताना त्याच गटातील भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र या २ विषयांचे गुण त्या त्या गटात ग्राह्य धरले जाणार आहेत. गटांतील विषयांची विभागणी होणार नसल्याचं सीईटी सेलनं स्पष्ट केलं आहे.



हेही वाचा -

महापालिकेला वाटते मुंबई अस्वच्छ होण्याची भिती

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकात रविवारी गर्डर ब्लॉक



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा