Advertisement

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकात रविवारी गर्डर ब्लॉक

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकात नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकात रविवारी गर्डर ब्लॉक
SHARES

मध्य रेल्वेच्या विक्रोळी स्थानकात नवीन पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या कामासाठी रविवारी संध्याकाळी ५ तासांचा विशेष ब्लॉक मध्य रेल्वेनं घोषित केला आहे. संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत हे काम करण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळं रात्री उशिरा घरी जाणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

१४० टन वजनी गर्डर

विक्रोळी स्थानकातील पुलासाठी १४० टन वजनी गर्डर उभारण्यात येणार आहे. रविवारी संध्याकाळी घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळं डाऊन मार्गावरील लोकल अप मार्गावरून धावणार आहेत. तसंच, काही लोकल फेऱ्या विलंबानं धावणार आहेत.

ब्लॉक घोषित

या कामासाठी विद्याविहार ते मुलुंड डाऊन मार्गावर मध्य रेल्वेने ब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉक दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनसवरील अप आणि डाऊन मेल-एक्स्प्रेस विद्याविहार ते ठाणे दरम्यान अप मार्गावर वळवण्यात येणार आहेत.



हेही वाचा -

'सीएस' परीक्षेतील २ पेपर ढकलले पुढे, कारण अस्पष्ट

मुंबई महापालिकेत १० रुपयात थाळी



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा