शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत दहा रुपयात थाळी देण्याचं आश्वासन दिलं होतं. आता त्याची पहिली सुरुवात मुंबई महानगरपालिकेतून होत आहे. मुंबई महापालिकेच्या उपहारगृहात अवघ्या १० रुपयांत थाळी उपलब्ध झाली आहे. गुरुवारी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या थाळीचा शुभारंभ करण्यात आला.
या योजनेअंतर्गत पालिका कर्मचाऱ्यांना दहा रुपयांत भरपेट जेवण मिळणार आहे. ही योजना पालिका कर्मचाऱ्यांनाच लागू असल्याचेही पालिकेकडून सांगण्यत आलं आहे. बाहेरील व्यक्तिंना पालिका कँटीनमध्ये दहा रुपयांत थाळी देण्यात येणार नसल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलं.
शिवसेनेनं विधानसभा निडवणुकीत वचननामा प्रकाशित केला होता.
त्यात राज्यात दहा रुपयांत थाळी देण्याची घोषणा केली होती.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आलं आहे. या पार्श्वभूमीवर दहा रुपयांत थाळी देण्याच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे येत्या काळात मुंबईच्या अनेक भागांमध्ये १० रुपये थाळी सुरू होऊ शकते.
हेही वाचा