Advertisement

ठाण्यात महिलांसाठी पहिली 'पावडर रुम'

महिलांची शौचालयाची समस्या ओळखून ठाण्यात एक वेगळा प्रयोग हाती घेण्यात आला आहे. या संस्थेनं घेतलेल्या पुढाकारामुळे सार्वजनिक शौचालयातील चित्र पालटू शकतं.

ठाण्यात महिलांसाठी पहिली 'पावडर रुम'
SHARES

सार्वजनिक शौचालयं म्हटली की डोळ्यासमोर उभं राहतं ते एकच चित्र ते म्हणजे अस्वच्छता, दुर्गंधी... या कारणांमुळे अनेक जण सार्वजनिक शौचालयांमध्ये जाणं टाळतात. विशेष करून स्त्रियांना यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. पण महिलांची हीच समस्या ओळखून ठाण्यात ‘लूम्स ॲण्ड व्हिवर रिटेल्स प्रा.लि’ या संस्थेनं एक वेगळा प्रयोग हाती घेतला आहे. या संस्थेनं घेतलेल्या पुढाकारामुळे सार्वजनिक शौचालयातील चित्र पालटू शकतं


संकल्पना कुणाची?

लूम्स ॲण्ड व्हिवर रिटेल्स प्रा.लि’ या संस्थेनं ‘लू-‘वुमन्स पावडर रूम’ नावाचा नवीन प्रयोग हाती घेतला आहे. या संस्थेच्या शिवकला मुदलियार आणि मनीषा केळशीकर यांनी मिळून ठाण्यात WOLOO (Woman's Loo) सुरु केलं आहे. हे महिलांसाठीचं सार्वजनिक प्रसाधन गृह आहे, पण इथं स्वच्छतेला सर्वाधिक महत्त्व दिलं गेलं आहे.

प्रसाधनगृहाच्या बाहेर सुरक्षेची योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. प्रसाधनगृहाच्या बाहेर सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. साधारण सार्वजनिक शौचालयात दुर्गंधी, अस्वच्छता असते. पण WOLLO शौचालयातील वातावरण मात्र वेगळं आहे. 


'WOLLO'ची खासियत

शौचालयाशिवाय आत एक छोटं कॅफे आहे. त्यामुळे तुम्ही कॉफी किंवा चहा घेता येतो. शिवाय एक स्टोअर पण आहे. या स्टोअरमध्ये महिलांसाठीची उत्पादनं ठेवण्यात आली आहेत. गरज पडल्यास शिलाईसाठी कीट ठेवण्यात आलाय. ज्या महिलांसोबत लहान मुल असेल त्यांच्यासाठी खास डायपर बदलण्याची जागा, तसंच स्तनपान कक्ष ठेवण्यात आलंय.

किती किंमत?

तुम्हाला WOLOO वापरायचा असेल तर त्यासाठी प्रत्येकी २० रुपये फी द्यावी लागेल. रोज प्रवास करणाऱ्यांसाठी दर महिना ४९९ रुपये सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. या बदल्यात मोफत चहा, कॉफी, पाणी, सॅनिटरी नॅपकीन दिलं जातं.


लवकरच मुंबईत होणार सुरू

१९ नोव्हेंबरपासून WOLOO  महिलांसाठी खुलं झालं आहे. WOLOO ची पहिली सुरुवात ठाण्यातून झाली. कारण ठाणे हे हार्बर आणि सेन्ट्रल रेल्वे मार्गांना जोडणारं ठिकाण आहे. पण लवकरच मुंबईच्या जवळजवळ १० भागांमध्ये WOLOO  सुरु होणार आहे.

कुठे आहे?

शॉप नं. ९, परांजपे उद्योग भवन, गोखले रोड, पोस्ट ऑफिसच्या समोर, आंबेडकर पुतळ्याजवळ, ठाणे स्टेशन

हेही वाचा

हे आहेत मुंबईतील ७ सुपर'मॅन'

हेल्पफूल 'अल्पो'प्रहार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा