विद्यापीठात नवीन दोन कोर्सला सुरूवात

Kalina
विद्यापीठात नवीन दोन कोर्सला सुरूवात
विद्यापीठात नवीन दोन कोर्सला सुरूवात
See all
मुंबई  -  

मुंबई विद्यापीठात ‘इमोशनल इन्टेलिजन्स अॅण्ड ह्यूमन रिलेशन’ आणि ‘मास्टर्स इन इमोशनल इन्टेलिजन्स अण्ड लाईफ कोचिंग’ हे दोन नवे कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. या कोर्सचा कालावधी 2 वर्षांचा आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारचे कोर्स सुरू करण्यात येणार आहेत. येत्या शैक्षणिक वर्षापासून या कोर्सला सुरूवात होईल. या कोर्सच्या अभ्यासानंतर 100 टक्के रोजगार मिळेल अशी हमी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी दिली.

एका खासगी शैक्षणिक संस्थेसोबत संयुक्त विद्यमाने देशात प्रथमच या अभ्यासक्रमाची सुरूवात करण्यात येत आहे. विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये हे वर्ग सुरू होतील. या अभ्यासक्रमामुळे उत्पादन, माहिती आणि तंत्रज्ञान, किरकोळ सल्लागार, बॅंकिंग अशा क्षेत्रात विविध विभागांमध्ये करीअर संधी उपलब्ध होतील, असा विश्वास कुलगुरूंनी व्यक्त केला. याआधी ऑक्सफर्ड आणि हार्वर्ड या विद्यापीठात हे कोर्स सुरू आहेत. त्यानंतर पहिल्यांदाच हा कोर्स भारतात सुरू करण्यात येतोय.

जुलै महिन्यापासून या कोर्सच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होईल, आणि ऑगस्ट महिन्यापासून नियमीत वर्गाला सुरूवात होईल. प्रत्येक अभ्यासक्रमासाठी 40 असे एकूण 80 विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. प्रवेशासाठी www.gicededu.co हे संकेतस्थळ देण्यात आले आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.