Advertisement

रोज १ तास फिटनेससाठी, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही धावणार

कॉलेजांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी ‘फिट’ राहावं म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगा (UGC)ने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.

रोज १ तास फिटनेससाठी, विद्यार्थ्यांसोबत शिक्षकही धावणार
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वीच ‘फिट इंडिया’चा नारा दिला. तेव्हापासून अख्ख्या देशभरात ‘फिटनेस’चे वारे वाहू लागले आहेत. त्यानुसार कॉलेजांतील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी ‘फिट’ राहावं म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगा (UGC)ने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रत्येकाने दिवसाला तासभर तरी व्यायाम करावं, असं सूचवण्यात आलं आहे.

‘फिट इंडिया’ मोहिमेअंतर्गत शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालये इथं आरोग्यास प्राधन्य द्यावे अशी सूचना करण्यात आली आहे. या सूचनेप्रमाणे प्रत्येक कार्यालयाने आपल्या स्तरावर काही नियम तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यात विद्यापीठ अनुदान आयोगाचाही समावेश आहे.

‘या’ सूचनांचा समावेश

विद्यापीठ अनुदान आयोगाने देशातील विद्यापीठ आणि या विद्यापीठांशी संलग्नीत काॅलेजातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत नियमावली तयार केली आहे. या नियमावलीनुसार देशातील सर्व कॉलेजांमध्ये ‘पीटी’च्या तासाचा समावेश करावा, विद्यार्थी, कर्मचारी आणि शिक्षकांनी रोज १ तास व्यायामासाठी राखीव ठेवावा तसंच या तासभरात योगा, ध्यान, चालणं, सायकल चालविणं, एरोबिक्स, नृत्य, पारंपरिक कलाविष्कार आदीच्या माध्यमातून व्यायाम करावा, वेळोवेळी मॅरेथॉन, वॉकेथॉन, सायकल स्पर्धा, धावण्याची स्पर्धा, सामुहिक योगा आदीचे आयोजन करावं, कॉलेजांमध्ये सायकल झोन तयार करून सायकल उपलब्ध करून द्याव्यात, विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याबाबत विशेष काळजी घेण्यासाठी विविध कार्यशाळांचे आयोजन करावं, आरोग्य शिबिराचं आयोजन करून वार्षिक आयेग्य तपासणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. 

विजेत्याची घोषणा

त्याचप्रमाणे विद्यापीठ आणि काॅलेजांत व्यायामासंदर्भात होणाऱ्या कार्यक्रमाचा तपशील नोंदवून तो राष्ट्रीय पातळीवर तयार करण्यात येणाऱ्या वेबसाइटवर अपडेट करावा. या माहितीनुसार राष्ट्रीय पातळीवरील विजेत्यांची घोषणा केली जाणार असल्याचंही यात नमूद करण्यात आलं आहे.

स्वयंसेवकांची टीम

ही मोहीम कॉलेज कॅम्प्समध्ये राबविण्यासाठी स्वयंसेवकांची टीम उभारण्याची सूचना यात करण्यात आली आहे. त्यानुसार विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांतून स्वयंसेवक तयार करण्यात यावेत. स्वयंसेवक तयार करण्यासाठी प्रोत्साहनपर व्याख्यान करणाऱ्यांना निमंत्रित करून त्यांच्या व्याख्यानांचं आयोजन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.हेही वाचा-

मुंबईत ४६ टक्के विद्यार्थी पाहतात पॉर्न व्हिडीओ

प्लास्टिक बंदी: प्लास्टिक जमा न केल्यास होणार तुरूंगवाससंबंधित विषय