Advertisement

मुंबईत ४६ टक्के विद्यार्थी पाहतात पॉर्न व्हिडीओ


मुंबईत ४६ टक्के विद्यार्थी पाहतात पॉर्न व्हिडीओ
SHARES

दिवसेंदिवस बलात्काराच्या घटना आणि पॉर्न बघणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढते आहे. मुंबईत दर आठवड्याला बलात्कारावर आधारित ४० व्हिडीओ  विद्यार्थी पाहत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत मुंबईत ५०० विद्यार्थ्यांवर सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेतून ही बाब समोर आली आहे. या सर्व्हेसाठी मुंबईतील ३० इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या ५०० विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला होता. यात १८८ मुले तर ३४५ मुली होत्या. सर्व विद्यार्थ्यांचं वय १६-२२ वयोगटात होतं.

पॉर्न बघण्याची सवय

रेस्क्यू रिसर्च अँन्ड ट्रेनिंग चॅरिटेबल ट्रस्टकडून हा सर्व्हे करण्यात आला. यावेळी पॉर्न बघण्याची सवय आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या जीवनावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यात आला. तसंच, या सर्व्हेचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांकडून बघण्यात येणारं हार्ड कोर पॉर्न आणि त्याचा मुलांच्या वागण्यावर होणारा परिणाम काय आहे हे जाणून घेणं होतं.

प्रकरणांमध्ये वाढ

या सर्व्हेच्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडीओ बघितल्यामुळं स्वत:चा न्यूड फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचं समोर येतं आहे. त्याशिवाय, सर्व्हेनुसार ३३ टक्के मुलं आणि २४ टक्के मुली पॉर्न व्हिडीओ पाहिल्यानंतर सेक्सटिंग फोटो शेअर करताततर ३५ टक्के विद्यार्थी व्हिडीओ पाहून स्वत:ला सेक्सुअल एक्टिविटीशी जोडून घेतात.

पॉर्न साईट्सवर बंदी


याशिवाय पॉर्न व्हिडीओ पाहणाऱ्यांची संख्याही कमी झालेली नाही. यावर उपाय म्हणून केंद्र सरकारकडून अनेक पॉर्न व्हिडीओ साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, याबाबत संदर्भात केलेल्या सर्वेक्षणानुसार ४६ टक्के युवा वर्ग पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं आहेतर ८ मुलींपैकी एक मुलगी पैशांसाठी शरीर सौदा करण्यासाठी तयार झाली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.



हेही वाचा -

प्रकाश मेहतांच्या नाराज कार्यकर्त्यांनी पराग शहांची फोडली गाडी

‘आरे’ कारशेडचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने फेटाळल्या सर्व याचिका



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा