प्रकाश मेहतांच्या नाराज कार्यकर्त्यांनी पराग शहांची फोडली गाडी

मेहता यांनीच पालिकेच्या निवडणूकीला शहा यांना उमेदवारी भाजपकडून मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करत, निवडून आणले होते. त्याच शहा यांनी मेहता यांचा पत्ता कट केल्याचे मत कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवले जात आहे

प्रकाश मेहतांच्या नाराज कार्यकर्त्यांनी पराग शहांची फोडली गाडी
SHARES

भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या घाटकोपर पूर्व मतदार संघात प्रकाश मेहता यांना तिकीट नाकारल्यानं पराग शहा आणि मेहता यांचं समर्थक आमने सामने आले आहेत. राग अनावर झालेल्या प्रकाश मेहता यांच्या समर्थकांनी पराग शहा यांची गाडी फोडल्यानं वाद चिघळला. त्यावेळी कार्यकर्त्यांना सामोरं जात मेहतांनी हात जोडून पराग शहा यांचा रस्ता न अडवण्याची विनंती केली. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.


उमेदवारी अर्ज

भाजपनं अंतर्गत बंडाळी रोखण्यासाठी विधानसभा निवडणूकीत उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस उजाडला. तरी ज्येष्ठ भाजप नेत्यांना उमेदवारी यादीत स्थान दिलं नव्हतं. त्यातच शेवटच्या क्षणाला मातब्बर नेत्यांना नारळ देत घरी बसवल्यानं भाजपला ठिक ठिकाणी कार्यकर्त्यांचा उद्रेक पहायला मिळाला. भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या घाटकोपर पूर्व इथं मेहतांचं तिकिट कापून पक्षानं भाजप नगरसेवक पराग शहा यांना तिकिट दिल्यानं मेहतांचे कार्यकर्ते शुक्रवारी रस्त्यावर उतरले. त्यावेळी चिडलेल्या कार्यकर्त्यांनी शहा यांच्या गाडी फोडली. ऐवढ्यावरच न थांबता कार्यकर्त्यांनी समजूत काढायला आलेल्या माजी खासदार किरीट सोमय्या यांना ही धक्काबुककी केल्याचं म्हटलं जातं आहे.


मेहतांचा पत्ता कट

मूळात मेहता यांनीच महापालिकेच्या निवडणूकीला शहा यांना उमेदवारी भाजपकडून मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करत, निवडून आणलं होतं. त्याच शहा यांनी मेहता यांचा पत्ता कट केल्याचं मत कार्यकर्त्यांकडून बोलून दाखवलं जात आहे. त्यामुळं शहा यांच्या उमेदवारीचा अर्ज भरायला जाताना मेहता यांच्या कार्यकर्त्यांनी गदारोळ केला आणि त्यांच्या गाडीची तोडफोड केली. 



हेही वाचा -

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांचा पत्ता कट



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा