Advertisement

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेनेनं मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेनं दिपाली सय्यद यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा शिवसेनेत प्रवेश
SHARES

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्ष प्रवेश करत आहेत. तसंच, अनेक पक्ष विरोधी पक्षातील नेत्यांना आव्हान देण्यासाठी नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवत आहेत. त्यानुसार, शिवसेनेनं मराठी अभिनेत्री दिपाली सय्यद यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात शिवसेनेनं दिपाली सय्यद यांना उमेदवारी जाहीर केली आहे. जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादीनं मुंब्रा-कळवा मतदारसंघातून उमेदवारी दिली असून येत्या विधानसभा निवडणुकीत अभिनेत्री दिपाली सय्यद मुंब्रा-कळवा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा पराभव करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  

उमेदवारी अर्ज दाखल 

अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी गुरूवारी रात्रीच्या सुमारास मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर दिपाली यांच्या हातावर शिवबंधन बांधून उद्धव यांनी दिपाली यांचं स्वागत केलं. त्यानंतर लगेचच दिपाली यांच्या उमेदवारीची घोषणा केली. शुक्रवारी दिपाली सय्यद या आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

निर्णायक मतं 

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचा मुंब्रा-कळवा मतदारसंघात मोठा दबदबा असून, गेल्या विधानसभा निवडणुकीत आव्हाड यांनी मोठ्या मताधिक्क्यानं शिवसेना उमेदवार दशरथ पाटील यांचा पराभव केला होता. त्यावेळी मुस्लीमबहुल मुंब्रा भागातून आव्हाड यांनी निर्णायक मतं मिळवली होती. ही मतं वळवण्यासाठी शिवसेनेनं दिपाली सय्यद यांना मैदानात उतरवण्याचं ठरवलं आहे.



हेही वाचा -

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांचा पत्ता कट

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानक ‘पर्यावरणस्नेही’



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा