मध्य रेल्वेवरील सीएसएमटी स्थानक ‘पर्यावरणस्नेही’

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी गजबजलेलं आणि जागतिक वारसा यादीत समावेश असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक 'पर्यावरणस्नेही' स्थानक म्हणून ओळखलं जाणार आहे.

SHARE

मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी गजबजलेलं आणि जागतिक वारसा यादीत समावेश असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानक 'पर्यावरणस्नेहीस्थानक म्हणून ओळखलं जाणार आहे. सीएसएमटी स्थानक हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तब्बल १२ पर्यावरणविषयक कसोट्यांवर पात्र ठरलं आहे. त्यामुळं या स्थानकाला 'आयएसओ १४००१ : २०१५' या प्रमाणपत्रानं गौरविण्यात आलं आहे. सीएसएमटी स्थानकं हे मध्य रेल्वे मार्गावरील मुख्य स्थानक असून मध्य रेल्वेचं मुख्यालयही या ठिकाणी आहे.

१२० देश

वृक्षलागवडस्वच्छतावीज बचतओला व सुका कचरा यांचं व्यवस्थापनसौर ऊर्जेचा वापरतिकिट आणि अन्य सुविधा अशा एकूण १२ विभागांतील नियमांची पूर्तता केल्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थेकडून 'आयएसओप्रमाणपत्र देण्यात येतेएखाद्या सेवेची गुणवत्ता तपासण्यासाठी आयएसओ अर्थात 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ स्टँडर्डायझेशनमानांकन घेतलं जातंआंतरराष्ट्रीय स्तरावर मानांकनाची गरज लक्षात घेता१२० देशांनी एकत्र येऊन हे प्रमाण निश्चित केलेलं आहे.

उद्यान उभारणं अत्यावश्यक

पर्यावरण पूरक स्थानकाचा किताब मिळवण्यासाठी रेल्वे स्थानकांना एकूण जागेपैकी ३० टक्के जागांवर उद्यान उभारणं अत्यावश्यक आहे. त्यानुसार, सीएसएमटी मुख्यालयासमोर आणि लांबपल्ल्याच्या प्लॅटफॉर्मवर उद्यानांची उभारणी करण्यात आली आहे. या उद्यानाची देखभाल रेल्वे कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते. त्याचसोबत प्लॅटफॉर्मची व स्थानकांची स्वच्छता, ओला व सुका कचरा यांचं व्यवस्थापनही सीएसएमटी स्थानकात करण्यात येतं आहे. त्याशिवाय, वीज बचतीसाठी मोठे पंखे कार्यान्वित करण्यात आले आहेत. 


सेल्फ तिकिटिंग झोन

प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटीमध्ये 'सेल्फ तिकिटिंग झोन' कार्यान्वित करण्यात आला आहे. याचबरोबर एटीव्हीएमसह दिव्यांग प्रवाशांसाठी रॅम्प उपलब्ध करून देणअयात आला आहे. प्रतीक्षालयांसह अन्य ठिकाणी विद्युत बचतीची उपकरणं लावण्यात आली आहेत. प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या गाडीमुळं प्रवाशांनाही त्याचा मोठा फायदा होतं आहे.हेही वाचा -

आरे कॉलनीत कारशेड होणार? शुक्रवारी समजणार अंतिम निकाल

अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस, उमेदवारांच्या गर्दीची शक्यतासंबंधित विषय
ताज्या बातम्या