Advertisement

अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस, उमेदवारांच्या गर्दीची शक्यता


अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस, उमेदवारांच्या गर्दीची शक्यता
SHARES

राज्यभरात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल करण्यास सरूवात केली. २७ सप्टेंबरपासून उमेदवारी अरेज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळं अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची त्या-त्या केंद्रावर गर्दी होणार असल्याची शक्यता वर्तवली जातं आहे.

१२१ अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई उपनगरात गुरुवारी दिवसभरात तब्बल ११० अर्ज दाखल झाले आहेत. आतापर्यंत दाखल झालेल्या एकूण अर्जांची संख्या १२१ आहे. यावेळी कलिना मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार संजय पोतनीसमनसेचे संजय तुर्डेजोगेश्वरी मतदारसंघातून शिवसेनेचे रवींद्र वायकर आदींनी अर्ज दाखल केले.

अर्ज दाखल

निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी ४ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे२७ सप्टेंबरपासून सुरू झालेली अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया शुक्रवारी संपुष्टात येईलअर्ज मागे घेण्याची तारीख सोमवार७ ऑक्टोबर आहेनिवडणुकीची तारीख २१ ऑक्टोबर आहे.

निवडणूकची पूर्वतयारी

मुंबई उपनगर जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून निवडणुकीसाठी वेगवेगळ्या स्तरावर तयारी सुरू आहे. त्यात ईव्हीएम मशिनची सरमिसळ करण्याच्या प्रक्रियेचा समावेश आहे. ही पद्धत दोन वेळा अंगिकारण्यात येते. त्यातील पहिली प्रक्रिया सोमवारी पूर्ण झाली. त्यासाठी सॉफ्टवेअरचा वापर केला जातो.

बॅलेट युनिट

उपनगर जिल्ह्यात होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत ७ हजार ३९७ मतदान केंद्रे आहेत. त्या मतदान केंद्रांवर १३ हजार ९६८ बॅलेट युनिट, ९ हजार ६८१ कंट्रोल युनिट, १० हजार ३२१ व्हीव्हीपॅट यंत्रं उपयोगात आणली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात आवश्यकतेनुसार सुमारे २० टक्के अतिरिक्त बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, ३० टक्के अतिरिक्त व्हीव्हीपॅट यंत्रं उपलब्ध केली जाणार आहेत.


हेही वाचा -

एमसीए निवडणूक : संजय नाईक सचिव तर अमोल काळे उपाध्यक्षपदी

सचिन पिळगावकरांची सन्मानचिन्ह त्याने भंगारात विकली



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा