एमसीए निवडणूक : संजय नाईक सचिव तर अमोल काळे उपाध्यक्षपदी


SHARE

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए) च्या सचिवपदी संजय नाईक तर उपाध्यक्षपदी अमोल काटे यांची निवड निश्चीत मानली जात आहे. दोन्ही पदांसाठी शुक्रवारी निवडणूक होणार आहे. एमसीएच्या सचिवपदासाठी आणि  उपाध्यक्षपदी नाईक आणि काटे यांचा एकमेव अर्ज आला आहे. त्यामुळे त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होणं फक्त बाकी आहे. नाईक आणि काटे हे दोघेही बाळ महादलळकर यांच्या गटाचे आहेत.

मंगळवार दि. ८ आॅक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यावेळी शैक्षणिक क्षेत्रातील विजय पाटील यांची एमसीच्या अध्यक्षपदी एकमताने बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे. मतदानाच्या एक दिवस आधी क्रिकेट मंडळाने गुरुवारी प्रतिस्पर्धी उमेदवारांची अंतिम यादी आपल्या संकेतस्थळावर घोषीत केली होती. माजी खेळाडू अमित दानी यांच्यासह एमसीएच्या निवडणुकीसाठी २७ उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत मतदान होणार आहे.

उमेदवारांची अंतिम यादी

अध्यक्ष - विजय पाटील 

उपाध्यक्ष - अमोल काळे

सचीव    - संजय नाईक

सहसचीव -  संगम लाड आणि शहलाम शेख

कोषाध्यक्ष : जगदीश आचरेकर आणि मयंक खंडवाला
संबंधित विषय
ताज्या बातम्या