सचिन पिळगावकरांची सन्मानचिन्ह त्याने भंगारात विकली

सचिन यांनी त्याच्या कार्यालयाचे काम काढले होते. कार्यालयाचे काम पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वी सचिन व सुप्रिया हे कार्यालयात गेले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने आणि इतर खासगी संस्थांनी त्यांना सन्मानित केलेली सन्मानचिन्ह त्याच्या निदर्शनास पडली नाही.

SHARE
सचिन पिळगावकरांची सन्मानचिन्ह त्याने भंगारात विकली

मराठी चिञपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या कार्यालयातून त्यांना मिळालेली सन्मानचिन्ह चोरून ती भंगारात विकून नोकराला सांताक्रूझ पोलिसांनी अटक केली आहे. अमृत सोलंकी असे या आरोपीचे नाव आहे. मागील एका वर्षात त्याने दहा नामकिंत सन्मानचिन्ह शेपाचशे रुपयात विकल्याची पोलिसांना कबूली दिली आहे.

सांताक्रूझच्या (पश्चिम) जुहू तारा रोड येथील जुहू अपार्टमेंटमध्ये सचिन पिळगांवकर यांचे कार्यालय आहे. वडिलोपार्जित असलेल्या कार्यालयात सचिन व सुप्रिया हे त्यांना मिळालेली सर्व सन्मानचिन्ह ठेवायचे. यात त्याचे दिवंगत  शरद पिळगावकर यांची ही सन्मानचिन्ह होती. या कार्यालयाच्या देखभालीसाठी अमृत सोलंकी याला ठेवले होते. कित्येक वर्षांपासून तो सचिन यांच्याकडे कामाला असल्यामुळे सचिन यांचा तो अत्यंत विश्वासू नोकर होता.

दरम्यन काही दिवसांपूर्वी सचिन यांनी त्याच्या कार्यालयाचे काम काढले होते. कार्यालयाचे काम पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वी सचिन व सुप्रिया हे कार्यालयात गेले. त्यावेळी महाराष्ट्र सरकारने आणि इतर खासगी संस्थांनी त्यांना सन्मानित केलेली सन्मानचिन्ह त्याच्या निदर्शनास पडली नाही. त्यावेळी त्या सन्मानचिन्हाबाबत सचिन यांनी अमृतला विचारले असता. अमृतने ती सन्मानचिन्ह धुळीत खराब होतील म्हणून गोणीत भरून ठेवल्याचे सांगितले. दोन दिवसांनी पून्हा सचिन कार्यालयात आले त्यावेळी त्यांनी पून्हा त्या सन्मानचिन्हाबाबत विचारले असता. अमृतने ती सन्मानचिन्ह ठेवलेली गोणी मिळत नसल्याचे सांगितले.

अमृतच्या या उत्तरानंतर सचिन आणि सुप्रिया यांनी सांताक्रूझ पोलिसांची मदत घेत गुन्हा नोंदवला. पोलिस चौकशीत ती सन्मानचिन्ह अमृतनेच शेपाचशे रुपयांसाठी भंगारात विकल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी सांताक्रूझ पोलिसांनी अमृतवर गुन्हा नोंदवत त्याला अटक केली. ही विकलेली सन्मानचिन्हे पून्हा मिळवण्याचा पोलिस आता प्रयत्न करत आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या