Advertisement

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांचा पत्ता कट

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली.

भाजपची चौथी यादी जाहीर; विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांचा पत्ता कट
SHARES

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपनं आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. चौथी यादी जाहीर झाली तरी माजी मंत्री विनोद तावडेप्रकाश मेहता यांच्यासह कुलाबा आमदार राज पुरोहित यांचं या यादीत नाव नाही. त्यामुळं विनोद तावडेप्रकाश मेहता आणि राज पुरोहित यांचा पत्ता कट करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

७ उमेदवार

भाजपनं उमेदवारीसाठी वेटिंगवर असलेल्या एकनाथ खडसे यांना दिलासा दिला आहे. त्यांची कन्या रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी दिली आहे. शुक्रवारी सकाळी भाजपनं ७ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीत मुंबईतील ३ मतदारसंघांचा समावेश आहे.

विद्यमान आमदारांना संधी नाही

मुंबईतील बोरीवली, कुलाबा व घाटकोपर पूर्व या मतदारसंघातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी नाकारण्यात आली आहे. त्यांच्या जागी नवे चेहरे देण्यात आले आहेत. बोरीवली येथून भाजपने सुनील राणे यांना तिकीट दिलं आहे. एसआरए घोटाळ्यात नाव असलेल्या प्रकाश मेहता यांना डावलून घाटकोपर पूर्वमधून नगरसेवक पराग शहा यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे. कुलाबा मतदारसंघातून पुरोहित यांच्याऐवजी विधानपरिषदेचे सभापती व राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे.

चौथी यादी

  • बोरीवली - सुनील राणे
  • घाटकोपर पूर्व - पराग शाह
  • कुलाबा - राहुल नार्वेकर
  • तुमसर - प्रदीप पडोळे
  • मुक्ताईनगर - रोहिणी खडसे
  • काटोल - चरणसिंग ठाकूर
  • नाशिक पूर्व - अॅड. राहुल ढिकले



हेही वाचा -

ऑक्टोबर उकाड्याची मुंबईकरांना जाणीव

अर्ज भरण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस, उमेदवारांच्या गर्दीची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा