Advertisement

विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासासाठी वर्षा गायकवाड करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

येत्या १५ तारखेपासून महाविद्यालय सुरु होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे.

विद्यार्थ्यांच्या लोकल प्रवासासाठी वर्षा गायकवाड करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा
SHARES

येत्या १५ तारखेपासून महाविद्यालय सुरु होणार आहे. यावेळी विद्यार्थ्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं आहे. तसंच, आझाद मैदानावर सुरु असलेल्या आंदोलनाबाबतही येत्या २ दिवसात अधिकृत निर्णय घेणार असल्याचंही वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक झाली. आंदोलनकर्त्यांना आर्थिक तरतूद देण्यात यावी अशी मागणी केली आहे. १५ फेब्रुवारीपासून महाविद्यालयं सुरु होणार असल्याची माहिती राज्याचे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली. कुलगुरुंशी चर्चा झाली आणि त्यानुसार महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बसण्याच्या व्यवस्थेच्या ५० टक्के उपस्थितीत सुरू करण्याची परवानगी आहे. विद्यालयं सुरू होताना वसतीगृहे सुरू करताना ती टप्प्याटप्प्यानं सुरू होणार आहेत. परीक्षा ऑफलाईन की ऑनलाईन याचा निर्णय विद्यापीठांनी घ्यावा, असं सांगण्यात आलं आहे. तसंच, शहरातील विद्यार्थी ग्रामीण भागात गेले आहेत. त्यांना शिक्षण ऑफलाइन घ्यायचं की ऑनलाईन याचा अधिकार विद्यार्थ्यांना असेल. स्ट्रक्चरल ऑडीट, फायर ऑडिट करूनच वसतीगृहं सुरू होणार आहेत. 

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा