Advertisement

1,400 पालिका शिक्षकांची दिवाळी अंधारातच


1,400 पालिका शिक्षकांची दिवाळी अंधारातच
SHARES

मुंबई - महानगर पालिकेच्या 149 माध्यमिक शाळांतील अंदाजे 1,400 शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची गेल्या कित्येक वर्षांपासून दिवाळी अंधारातच साजरी होत आहे..
पालिकेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षकांना, पालिकेकडून अनुदान देण्यात येणाऱ्या खासगी शाळांना पालिकेकडून बोनस देण्यात येतो, मात्र पालिकेच्याच कायमस्वरूपी कर्मचारी असलेल्या या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बोनसच दिला जात नाही.  बोनस न देण्याचं कोणतंही योग्य कारण पालिका प्रशासन आणि शिक्षण समितीकडून देण्यात येत नाही. त्यामुळे या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये पालिकेबाबत प्रचंड असंतोष आहे.

या शिक्षकांना बोनस मिळावा, म्हणून शिक्षण समितीचे सदस्य शिवनाथ दराडे गेली कित्येक वर्ष शिक्षण समितीकडे पाठपुरावा करतायत. मात्र, शिक्षण समितीकडून याकडे कानाडोळा होत असल्याचा आरोप होतोय. 149 शाळांपैकी 49 माध्यमिक शाळांना राज्य सरकारचं अनुदान असलं, तरी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी नेमणूक आणि इतर प्रक्रिया पालिकेकडूनच पार पाडली जाते. तर उर्वरित 100 शाळांना पालिकेचे अनुदान, पगार असताना त्यांनाही बोनस दिला जात नाही. त्यामुळे यंदा तरी यांना बोनस द्यावा, यासाठी दराडे यांनी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांकडे एका पत्राद्वारे मागणी केलीय. ही मागणी येत्या आठ दिवसांत मान्य झाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही दराडे यांनी दिलाय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा